Pimpri Chinchwad : सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कलर स्प्रे मारून घरफोडी; पिंपरी चिंचवड शहरातील घटना

Pimpri Chinchwad News : स्वतःची ओळख लपवण्यासाठी सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरावर ब्लॅक कलर स्प्रे मारून सोसायटीत प्रवेश केला आहे. त्यानंतर सोसायटीच्या आतील एका सदनिकेत घरफोडी केली आहे
Pimpri Chinchwad
Pimpri ChinchwadSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात एक घरफोडीच्या घटना समोर आली आहे. या घटनेत चोरट्यानी आपली ओळख पटू नये यासाठी घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरावर ब्लॅक कलर स्प्रे मारून चोरट्याने घरफोडी केली आहे. यात घरातून काही मौल्यवान वस्तूंची चोरी करून चोरटा पसार झाला आहे. सदर घटना समोर आल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे नीलख परिसरातील विशाल नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तीन चोरटे विशाल नगर येथील एका सोसायटीमध्ये प्रवेश केला. यानंतर स्वतःची ओळख लपवण्यासाठी सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरावर ब्लॅक कलर स्प्रे मारून सोसायटीत प्रवेश केला आहे. त्यानंतर सोसायटीच्या आतील एका सदनिकेत घरफोडी केली आहे. १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री हा प्रकार घडला असून या घरफोडी करणाऱ्या चोरट्यांची सीसीटीव्ही दृश्य आता समोर आली आहेत.

Pimpri Chinchwad
Sangli : संपत्तीसाठी जन्मदात्या बापालाच काढले घराबाहेर; बहिणींनाही केली मारहाण, परस्पर विरोधी तक्रार दाखल

पुन्हा दुसऱ्या दिवशी चोरीसाठी आला आणि अडकला

कल्याण : अंबरनाथ स्टेशन परिसरातील स्काय वॉकवर एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची चैन हिसकावून चोरटा पसार झाला होता. त्याची तक्रार विद्यार्थ्याने कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी घटना घडली त्या ठिकाणी सापळा रचला होता. चोरटा पुन्हा त्याच ठिकाणी चोरी करण्यासाठी आला असता त्याला रेल्वे पोलिस आणि आरपीएफने पकडले आहे. चोरट्याचे नाव मुकेश कोळी असे आहे. 

Pimpri Chinchwad
Bhandara : पासच्या कारणावरून बसमध्ये गोंधळ; एसटीच्या महिला वाहकाने विद्यार्थिनीचे खेचले केस

अंबरनाथमध्ये राहणारा कृष्णा कहार हा विद्यार्थी अंबरनाथहून लोकलने विठ्ठलवाडीला शिकण्यासाठी जातो. ३० सप्टेंबरला तो अंबरनाथ स्टेशन परिसरातील स्काय वॉकवर उभा होता. त्याच वेळी त्याच्या समोर एक जण अनाचक आला. त्याने कृष्णाच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढला. कृष्णा याने त्याची चैन चोरी करुन एक जण पळाला असल्याची तक्रार कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात दिली. कल्याण रेल्वे पोलिस आणि आरपीएफ यांनी घटना घडली त्याठिकाणी सापळा रचला. चोरटा पुन्हा त्याच ठिकाणी चोरी करण्यासाठी आला असता रेल्वे पोलिस आणि आरपीएफच्या जाळ्यात फसला. पैशाची गरज असल्याने त्याने चोरी केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com