Sangli : संपत्तीसाठी जन्मदात्या बापालाच काढले घराबाहेर; बहिणींनाही केली मारहाण, परस्पर विरोधी तक्रार दाखल

Sangli News : संपत्तीसाठी जन्मदात्या वडिलांना घराबाहेर काढून बहिणींना मारहाण करणाऱ्या भावाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र बहिणींवर हल्ला करूनही तो मोकाट असून पीडित मात्र न्यायासाठी भटकंती करतायत
atpadi police station
atpadi police stationSaam tv
Published On

सांगली : लहानपणी सर्व हट्ट पुरवून ज्या वडिलांच्या खांद्यावर खेळत हा मुलगा मोठा झाला. त्याच वडिलांना संपत्तीसाठी घराबाहेर हाकलले. एवढंच नव्हे तर सख्ख्या बहिणींवर जीवघेणा हल्ला करून आधीच पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप बहिणींनी आणि वडिलांनी केली आहे. दरम्यान आटपाडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात नात्यांची नासाडी करणारी  धक्कादायक घटना घडली आहे. मुळात आई-वडिलांचा सांभाळ करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. पण आटपाडीत या कायद्याची पायमल्ली झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. आईचे निधन झाले असून मुलगा वडिलांना वागत नसून मुलगी त्यांची सेवा करत आहे. अशात संपत्तीसाठी मुलाकडून हा धक्कादायक प्रकार करण्यात आला आहे. 

atpadi police station
RSS: दसऱ्याच्या दिवशीच संघाच्या शाखेवर मोठी कारवाई; 39 स्वयंसेवक ताब्यात, काय आहे कारण, जाणून घ्या

पोलिसात तक्रार दाखल 

दरम्यान १५ सप्टेंबर रोजी आईच्या श्राद्धाला घरी नैवेद्य द्यायला गेलेल्या बहिणी व वडिलांवर भावाने थेट काठीने हल्ला केला. यात गंभीर जखमी बहिणी सांगली सिव्हिलमध्ये दाखल झाल्या आणि उपचार केला. पण भावाने मात्र पोलिसात आधीच तक्रार दाखल केली. त्यानंतर वडिलांनी आणि दोघी बहिणींनी जखमी अवस्येत भावा विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस योग्य तो तपास करत आहे.

atpadi police station
Pimpri Chinchwad : दसऱ्याच्याच दिवशी कुटुंबावर आभाळ कोसळले; लिफ्टमध्ये अडकून मुलाचा मृत्यू

महिला आयोगाने लक्ष घालण्याची मागणी 
वडिलांच्या संपत्तीवर कब्जा, वडिलांना घराबाहेर काढलं, बहिणींवर हल्ले केले आणि खोट्या तक्रारींचा खेळ करत आहे. उलट मुलगी उज्वला चार वर्षांपासून स्वतःचा संसार सोडून वडिलांची सेवा करत आहे. महिलांच्या हक्कांसाठी महिला आयोग आहे . त्यांनी यात लक्ष घालावे आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी या बहिणींनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com