पिंपरी चिंचवड : एका इमारतीत असलेल्या लिफ्टच्या दरवाजा खुलल्याने लिफ्टमध्ये अडकून एका बारा वर्षाच्या चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटना घडली यावेळी मुलगा लिफ्टमध्ये एकटाच होता. घरात दसऱ्याच्या सणाची तयारी सुरु असताना घडलेल्या या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील चौवीसवाडी परिसरात असलेल्या अपार्टमेंटमध्ये सायंकाळच्या सुमारास हि दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेत बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान काल दसरा असल्याने सर्वत्र तयार सुरु होती. याच वेळी पिंपरी चिंचवडच्या चौविसवाडी परिसरातील राम स्मृती सोसायटी बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये हा चिमुकला चढला होता. मात्र दरवाजा खुलल्याने चिमुकला दरवाजात अडकला होता.
अग्निशमन पथकाने केली सुटका
चौवीसवाडी येथील राम स्मृती सोसायटी येथे काल संध्याकाळी ही दुर्देवी घटना घडली आहे. राम स्मृती सोसायटी बिल्डिंगच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्या दरम्यान लिफ्ट अडकून बसली होती. या लिफ्टमध्ये एक मुलगा अडकून फसला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन घटनास्थळाकडे रवाना होऊन लिफ्ट मधून मुलाची सुटका केली.
रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू
लिफ्टमध्ये अडकल्याने मुलगा गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला होता. दरम्यान मुलाच्या मृत्यूने आई- वडिलांनी एकच आक्रोश केला. दसऱ्याच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.