सचिन बनसोडे
नेवासा (अहिल्यानगर) : अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हुंडा बंदीचा ठराव करण्यात आला आहे. तसेच गावात कोणी हुंडा घेत असेल, याची माहिती देणाऱ्यास पाच हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहे; अशी अनोखी बक्षीस योजना देखील लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात गाजत असलेले वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर लग्नात हुंडा घेतला जात असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला होता. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर चर्चा करून असे प्रकार घडू नये; यासाठी नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावात कुणीही हूंडा देणार नाही किंवा घेणार नाही; असा आदर्श ठराव करण्यात आला आहे.
हुंडा बंदीसाठी ग्रामपंचायतीचाच पुढाकार
अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव नेहमी समाज हिताचे निर्णय घेत असते. त्यामध्ये शिवी बंदी, विधवा पुनर्विवाह, विद्यार्थी आणि गावाच्या हिताचे वेगवेगळे ठराव सौंदाळा ग्रामपंचायत मार्फत आजवर घेतले गेले आहेत. यानंतर हुंडा बंदीची प्रथा रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत थेट ग्रामसभेत ठराव केला आहे. ग्रामपंचायतने केलेला हा ठराव दिशादर्शक असून राज्यातील इतर ग्रामपंचायतींने असा ठराव केला आणि गावातील एखाद्या महिलेवर होणारा अन्याय दूर केला; तर वैष्णवी हगवने सारखी कुणालाही आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.
त्याला मिळणार ५००० रुपयांचे बक्षीस
हुंडा घेणारा कळवा आणि ५००० रुपये मिळवा; अशी बक्षीस योजना सौंदाळा ग्रामपंचायतने सुरू केली आहे. गावातील एखाद्या कुटुंबात महिलेवर कौटुंबिक, मानसिक, शारीरिक असे वेगवेगळे प्रकारचे हिंसाचार होत असल्याची माहिती ग्रामपंचायतला कोणी पुराव्यासहित कळवली, तर त्या व्यक्तीला २१०० रुपये बक्षीस स्वरूपात दिले जाणार आहेत. ग्रामपंचायतीने स्थापन केलेली समिती सदर प्रकरणात महिलेला न्याय देण्याचे काम करेल. मुलगा, मुलगी दोघेही समान असून सुनेला लेकी प्रमाणे वागवलं गेलं पाहीजे असं गावातील महिलांना वाटतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.