Rohit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar : मोदी, शहा यांच्या जितक्या सभा तेवढे जास्त उमेदवार आमचे निवडणार; आमदार रोहित पवार यांचा भाजपवर निशाणा

Ahilyanagar News : विधानसभेच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत- जामखेड मतदारसंघातील जामखेड येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांची प्रचार सभा झाली

Rajesh Sonwane

सुशील थोरात 
अहिल्यानगर
: महाविकास आघाडीचे १७० पर्यंत उमेदवार निवडून येणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह या दोघांच्या जास्त सभा झाल्या, तर आमचे दोनशेच्या पुढे आमदार निवडून येतील आणि मतदार व्याजासकट तुम्हाला उत्तर देतील; असं आमदार रोहित पवार यांनी म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे. 

विधानसभेच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत- जामखेड मतदारसंघातील जामखेड येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पवार (Rohit Pawar) यांची प्रचार सभा झाली. या सभेत बोलताना रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनी माझी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विनंती आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या जास्तीत जास्त सभा लावाव्यात; असेही म्हटले आहे. 

भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्रात येऊन प्रश्न विचारतात की कृषिमंत्री असताना शरद पवारांनी काय केले? लोकसभेला अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन विचारला होता. त्यावेळी लोकशाहीच्या मार्गाने महाराष्ट्रातील लोकांनी उत्तर दिले आणि महायुतीचे २३ खासदारांवरून थेट नऊ खासदारांपर्यंत आकडा आला.

आता पुन्हा अमित शहा महाराष्ट्रात येऊन शरद पवारांनी काय केले? हा प्रश्न विचारत आहे. यामुळे आमच्या आमदारांची संख्या नक्की वाढेल असा दावा त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2026: यावर्षी पितृपक्ष कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Traffic Update : पुण्यात गणपती विसर्जनादिवशी वाहतुकीत मोठा बदल! महत्त्वाचे रस्ते राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग कोणते?

Katha Benefits : चवीपेक्षा आरोग्यासाठी गुणकारी पानातील 'कात', ५ फायदे वाचून व्हाल अवाक्

Maharashtra News Live Update: गिरीश महाजनांची कार्यतत्परता; अपघातग्रस्त ट्रक चालकाला स्वतः मदत करत बाहेर काढले

Pitru Paksha: श्राद्धाचे जेवण कोणाला द्यावं आणि कोणाला देऊ नये? जाणून घ्या धार्मिक परंपरेतील नियम

SCROLL FOR NEXT