nevasa nagar panchayat: Saam Tv
महाराष्ट्र

Ahilyanagar: माजी मंत्र्यांना नेवासामध्ये जोरदार झटका, नगरपंचायतीवर महायुतीची सत्ता, नगराध्यक्षपदी करण घुले

nevasa nagar panchayat: नेवासा नगरपंचायतीवर महायुतीचा झेंडा फडकला. महायुतीचे उमेदवार करणसिंग घुले यांचा विजय झाला आहे. त्यामुळे याठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Priya More

Summary -

  • नेवासा नगरपंचायतीवर महायुतीचा विजय

  • नगराध्यक्षपदी डॉ. करणसिंग घुले विजयी झाले

  • माजी मंत्री शंकरराव गडाखांना मोठा धक्का बसला

  • राहाता नगरपरिषदेत भाजपचा विजय झाला

अहिल्यानगरमध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीला चांगले यश मिळताना पाहिला मिळत आहे. नेवासा नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला आहे. महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. करणसिंग घुले विजयी झाले आहेत. किरण घुले नगराध्यक्ष होताच एकच जल्लोष करण्यात आला.

नेवासा नगरपंचायतीमध्ये गडाखांचा गड आला पण सिंह गेला. महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. माजी मंत्री शंकरराव गडाखांना धक्का बसला आहे. नगराध्यक्षपदी महायुतीचे डॉ. करण सिंग घुले विजयी झाले आहेत. १७ पैकी १० जागा गडाखांच्या शेतकरी क्रांतीकारी पक्षाला मिळाल्या आहेत. तर ६ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

तर दुसरीकडे अहिल्यानगरमधील राहाता नगरपरिषदेमध्ये देखील महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. याठिकाणी महायुतीचे २० पैकी १९ नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. स्वाधीन गाडेकर यांचा विजय झाला. राहात्याच्या नगराध्यक्षपदी भाजपचे स्वाधीन गाडेकर निवड झाली. राहता नगरपरिषदेमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गड कायम राखला आहे. तर याठिकाणी शहर विकास आघाडीला फक्त एकच जागेवर विजय मिळवण्यात यश आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Palika Election Result Live: वाशिमच्या कारंजा नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदावर एमआयएमचा झेंडा

Konkan Politics: कोकणात भाजपला हादरा, कणकवलीच्या नगराध्यपदी पारकर

Shubman Gill: शुभमन गिलच्या नावावर का बसली कात्री? रिपोर्टमधून सत्य कारण अखेर समोर

बांगलादेश पुन्हा पेटलं; जमावाने नेत्याचं घर पेटवलं, ७ वर्षांच्या मुलीचा होरपळून मृत्यू

Hair Care: केस ड्राय होऊन गळतायतं? मग पार्लर ट्रिंटमेंटपेक्षा घरीचं करा 'हा' हेअस मास्क, एका वॉशमध्येच दिसेल फरक

SCROLL FOR NEXT