Kopargaon Sugar Factory Saam tv
महाराष्ट्र

CNG Project : साखर कारखान्यातून CNG निर्मिती; कोपरगावमधील साखर कारखाना ठरला देशातील पहिला

Ahilyanagar News : कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय सहकार तथा गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

कोपरगाव (अहिल्यानगर) : साखर कारखान्यांमध्ये उसाच्या टाकाऊ पदार्थांपासून सीएनजी तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हा एक पर्यावरणपूरक असा प्रकल्प असून कोपरगाव मधील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात आता सीएनजी निर्मिती केली जात आहे. अर्थात सीएनजी निर्मिती करणारा हा देशातील पहिला साखर कारखाना ठरला आहे. 

आजच्या काळात पेट्रोल, डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांसोबत सीएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांची संख्या देखील वाढत आहे. अर्थात याच्या वापरामुळे पर्यावरणाला होणारी हानी कमी असल्याने वापर वाढू लागला आहे. गुजरात राज्यात याचे मोठे प्रकल्प असून आता महाराष्ट्रात देखील सीएनजी निर्मितीचा प्रकल्प उभारणीचे काम कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने केले आहे. 

दररोज होणार १२ टन सीएनजी निर्मिती 
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना CNG निर्मिती करणारा देशातील पहिला सहकारी साखर कारखाना ठरला आहे. अन्नदाता ते उर्जादाता या संकल्पनेतून ५० कोटी रुपये खर्चून साखर कारखान्यात सीएनजी प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून दररोज १२ टन सीएनजी निर्मिती केली जाणार असून पेट्रोलियम कंपन्यांना गॅस विक्री केली जाणार असल्याने कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. 

५ ऑक्टोबरला होणार शुभारंभ  

साखर कारखान्याचे वाया जाणारे सांडपाणी आणि डिस्लेरी स्पेंड यातून मिथेन काढून सीएनजी तयार केला जाणार आहे. दरम्यान कोपरगाव येथे उभारण्यात आलेल्या सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय सहकार तथा गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर प्रत्यक्षात या प्रकल्पातून सीएनजी निर्मिती करून विक्रीसाठी सुरवात केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Tourism : वीकेंडला अलिबागला ट्रिप प्लान करताय? मग 'ही' ५ ठिकाणं पाहाच

Journalist Rajiv Pratap : पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमुळे संशय वाढला!

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू

अभिषेक शर्मानं रचला इतिहास, ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं!

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT