Ahilyanagar Corporation Saam tv
महाराष्ट्र

Ahilyanagar Corporation : अहिल्यानगर मनपा निवडणूक प्रक्रिया रेंगाळणार; अंतिम प्रभाग रचना जाहीर न झाल्याने प्रक्रिया न्यायालयात जाण्याची शक्यता

Ahilyanagar news : मुदत संपूनही प्रभाग रचना जाहीर न केल्यामुळे विरोधी पक्ष असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे

Rajesh Sonwane

सुशील थोरात 
अहिल्यानगर
: अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याची तारीख ९ ते १३ ऑक्टोबरपर्यंत होती. मात्र १३ ऑक्टोबर संपून १४ ऑक्टोबर उजाडला तरी अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाने जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे सदरची निवडणूक प्रक्रिया न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

अहिल्यानगर महानगर पालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. इच्छुक उमेदवार देखील तयारीत आहे. महापालिकेची प्रभाग रचना १३ नोव्हेंबरला जाहीर होणे अपेक्षित असताना अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे निवडणूक आयोगाची भूमिका नेमकी काय आहे? हे कोणालाच समजू शकत नसून निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना का जाहीर केली नाही. याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक नगरसेवक आणि मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठाकरे गटाचा इशारा 

दरम्यान मुदत संपूनही प्रभाग रचना जाहीर न केल्यामुळे विरोधी पक्ष असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता निवडणूक आयोगाने पूर्वी जी प्रभाग रचना होती, ती आहे तशीच ठेवावी. जर निवडणूक आयोगाने दिलेली मुदत संपून देखील नवीन प्रभाग रचना जाहीर केली नाही तर आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठवू; असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दिला आहे.

प्रशासन दबावाखाली काम करतेय : काँग्रेस 
अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याची तारीख उलटूनही प्रभाग रचना जाहीर होत नसल्यामुळे प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सचिव सुनील क्षेत्रे यांनी केला आहे. महानगरपालिकेची अवस्था अत्यंत दयानिय करण्यात झाली असून नगरसेवक नसल्याने सर्व कारभार प्रशासकीय विभाग पहात आहे. यामुळे शहरात विविध नागरी समस्या उद्भवल्या असून लवकरात लवकर निवडणूक व्हावी; अशी नागरिकांची इच्छा आहे. मात्र निवडणूक आयोग आणि राज्य सरकार मिळून निवडणूक होऊ नये म्हणून प्रयत्न करत असल्याचा आरोप युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangram Jagtap: राष्ट्रवादीत 'संग्राम', अजित पवारांना 'ताप' जगतापांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरुच

De De Pyaar De 2 Trailer: अजय देवगण-रकुलच्या प्रेमात आर माधवन ठरणार अडसर; ट्रेलर पाहून हसून हसून पोट दुखेल

Credit Card: क्रेडिट कार्डचं कर्ज वाढत चाललंय? घाबरु नका! वापरा स्मार्ट अन् सोप्या टिप्स, बिल होईल कमी

Weather Update : दिवाळीत धो-धो कोसळणार? परतीचा पाऊस त्रास देणार; वाचा Report

Thackeray Brothers: मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंचं पारडं जड, 70 जागांवर मनसेची मतं निर्णायक?

SCROLL FOR NEXT