Washim : अट्टल मोटरसायकल चोरटा ताब्यात; ९ मोटरसायकल जप्त, रिसोड पोलिसांची कारवाई

Washim News : गेल्या काही दिवसांपासून पोलीस स्टेशन रिसोड हद्दीतून मोटारसायकल चोरीच्या घटनेत वाढ झाली होती, या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला असता संशयित ताब्यात सापडला
Washim
Washim Saam tv
Published On

मनोज जयस्वाल 

वाशीम : मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये झालेली वाढीबाबत अनेक तक्रारी पोलिसात दाखल होत्या. याचा पोलिसांकडून तपास सुरु असताना वाशीम आणि हिंगोली जिल्ह्यातून मोटर सायकल चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्याला रिसोड पोलिसांनी अटक केले आहे. त्यांच्या कडून चोरी केलेल्या एकूण ९ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणी आणखी तपास सुरु आहे.

वाशीमच्या रिसोड पोलिसांनी केलेल्या कारवाईत सचिन उर्फ मिटठू मानकर असे या आरोपीला ताब्यात घेतले असून तो रामनगर रिसोड येथिल रहिवाशी आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस स्टेशन रिसोड हद्दीतून मोटारसायकल चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. त्यामुळे ठाणेदार चव्हाण यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून रिसोड डीबी पथक चोरी गेलेल्या मोटरसायकलचे शोध घेत होते. यासाठी सीसीटीव्हीची तपासणी देखील करण्यात आली. 

Washim
Nashik Cyber Crime : डिजिटल अरेस्टची भीती; ज्येष्ठ नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा

चोरीच्या ९ मोटारसायकली जप्त 

दरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून सचिन उर्फ मिटठू मानकर याला पोलिसांनी ताब्यात घेवून विचारपूस केली असता, त्याने हिंगोली आणि वाशीम जिल्ह्यातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर चोरीच्या मोटारसायकल ठेवलेल्या ठिकाणी जात आरोपीकडून रिसोड आणि वाशीम शहर येथील एकूण ८ लाख २४ हजार रुपये किंमतीच्या ९ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहे. 

Washim
Gadchiroli : १० कोटीचे बक्षीस असलेल्या नक्षलवादीचे आत्मसमर्पण; वरिष्ठ नेता भूपती ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर शरण

पोलिसांकडून अधिकच तपास सुरु 

आणखी काही मोटरसायकलचे गुन्हे या आरोपीकडून उघड होतात का? याचा तपास रिसोड पोलीस करीत आहे. ही कारवाई रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले आणि त्यांच्या पथकाने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com