Ahilyanagar ganesh Visarjan Saam Tv
महाराष्ट्र

Ahilyanagar: गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गोंधळ, पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये कार्यकर्त्याचा मृत्यू

Ahilyanagar ganesh Visarjan: अहिल्यानगरमध्ये गणपती विसर्जनादरम्यान गोंधळ झाला. मिरवणुकीत गुलाल उधळताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.

Priya More
  • अहिल्यानगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज

  • भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तरुणाचा मृत्यू

  • दीपक वागसकरच्या मृत्यूनंतर भिंगारमध्ये तणाव

  • गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांच्या लाठीचार्जचा आरोप

  • आमदार संग्राम जगताप यांचे भिंगारमध्ये ठिय्या आंदोलन

सुशील बनसोडे, अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान राडा झाला. शहरातील भिंगार उपनगर भागात गणेश विसर्जन मिरवणूकदरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. दीपक वागसकर असे मयत तरुणाचे नाव आहे. गुलाल उधळण्यावरून लाठीचार्ज झाल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. या घटनेनंतर अहिल्यानगरमधील वातावरण तापले आहे. सध्या शहरामध्ये तणावाचे वातावरण आहे.

पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे आणि भिंगार पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्यामुळे लाठीचार्ज करण्यात आला. त्यामध्येच दीपक वागसकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर गणपती मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत भिंगार बंद आणि गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. या सर्व गोंधळानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप घटनास्थळी आले असून ते देखील आक्रमक झाले आहेत.

भिंगार येथे विसर्जन मिरवणुकी दरम्यान एका गणपती मंडळाच्या कार्यकर्ताचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. गणपती विसर्जनादरम्यान गुलाल उडवण्यावरून पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून यामुळे विसर्जन मिरवणूक जागेवर बंद करण्यात आली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी भिंगार येथे रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले.

जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांची तात्काळ बदली होत नाही तोपर्यंत भिंगार शहर बंद आणि विसर्जन न करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. मध्यरात्री उशिरापर्यंत शेकडो कार्यकर्ते भिंगार येथील भिंगार वेशीजवळ ठिय्या मारून बसले होते. तर सर्व गणपती विसर्जन करणाऱ्या मंडळांनी जागेवरच रस्त्यावर गणपती उभे केल्याने प्रशासना समोर मोठा पेच निर्माण झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Balumama Temple Trust : बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार, ५ जणांना अटक, नेमकं प्रकरण काय?

Weight Loss : ३० दिवसांत पोटावरची चरबी होईल कमी, चालून आल्यावर १ ग्लास प्या 'हा' हेल्दी ग्रीन ज्यूस

High cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणजे हार्ट अटॅक येणारच? हदयरोग तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

Rajapur Tourism : कोकणात दडलंय निसर्गाचं स्वर्गसुख! राजापूरची 'ही' ७ ठिकाणे फिरायला अजिबात चुकवू नका

SCROLL FOR NEXT