FIVE-YEAR-OLD TORTURED FOR ₹1,500 IN AHILYANAGAR, STEPFATHER ARRESTED AFTER VIRAL VIDEO saam tv
महाराष्ट्र

shocking: सावत्र बापाचं राक्षसी कृत्य; अवघ्या १५०० रुपयांसाठी हातपाय बांधून चिमुकल्याला अमानुष मारहाण

Ahilyanagar Stepfather Brutally Beaten Boy: अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या सावत्र मुलाचे हातपाय बांधून त्याला अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.

Bharat Jadhav

  • अवघ्या १५०० रुपयांसाठी पाच वर्षांच्या मुलाचे हातपाय बांधून अमानुष मारहाण करण्यात आली.

  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली.

  • सावत्र बाप अनिस वजीर शेख याला अटक.

पैशांसाठी पाच वर्षाच्या चिमुकल्याचे हातपाय बांधून अमानुष मारहाण केल्याचा संतापजनक व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. जालना पोलिसांनी चिमुकल्याची सुटका करत मुलाचा सावत्र बाप अनिस वजीर शेख याला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र गुन्हा शिर्डीत घडला असल्याने हा गुन्हा जालना पोलिसांनी शिर्डी पोलिसांकडे वर्ग केला आहे.. अवघ्या पंधराशे रुपयांसाठी आरोपीने हे अमानुष कृत्य केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय.

आरोपी अनिस शेख हा पत्नी आणि सावत्र मुलासह शिर्डीतील एका लॉजमध्ये थांबलेला होता. तेथील रूममध्ये त्यांनी पाच वर्षीय चिमुकल्याचे हातपाय बांधून अमानुष मारहाण केली. मोबाईलमध्ये मारहाणीचा व्हिडिओ चित्रित करून त्याने तो सोशल मीडियाव व्हायरल केला. त्यानंतर जालना येथील चिमूकल्याच्या आजोबांना फोन करून पैशांची मागणी केली.

पंधराशे रुपये न दिल्यास नातवाला मरेपर्यंत मारहाण करण्याची धमकी देत आजोबांकडून ऑनलाईन पैसे उकळले. आजोबांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिस वजीर शेख, राहणार सारवाडी, जिल्हा जालना याच्या विरोधात पॉक्सोसह खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना पोलिसांनी हा गुन्हा शिर्डी पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर आरोपीचा ताबा घेत त्याला राहाता न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी अनिस शेख याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, शिर्डी पोलिस गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT