Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीवर बिबट्याची झडप; उसाच्या शेतात आढळला मृतदेह

Ahilyanagar Akole News : मे महिन्यात देखील देवठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात ५७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केल्याने चिमुकलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

अकोले (अहिल्यानगर) : नागरी वस्तीमध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून हल्ले केल्याच्या घटना वाढत आहेत. अशातच अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने झडप घालत उचलून नेले. यात मुलीचा मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील देवठाण गाव शिवारात घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवठाण गावातील शेळके वस्ती परिसरात सदरची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत कविता लहानु गांगड (वय ३) या बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यापूर्वीही मे महिन्यात देखील देवठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात विठावाई काळे या ५७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केल्याने चिमुकलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. 

बिबट्याने उचलून नेत केले भक्ष

शेळके वस्ती परिसरात काल सायंकाळी घराच्या अंगणात खेळत कविता हि चिमुकली खेळत होती. याच वेळी बिबट्याने चिमुकलीवर हल्ला करत तिला उचलून नेले. यानंतर बिबट्या शेताच्या दिशेने पसार झाला होता. दरम्यान वस्तीतील काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी आरडाओरड करत बिबट्याच्या मागे धावत पाठलाग केला. मात्र बिबट्या उसाच्या शेतात शिरला होता. 

उसाच्या शेतात सापडला मृतदेह 

वस्तीतील नागरिकांनी शोध घेतला असता मृतदेह ऊसाच्या शेतात सुमारे ३०० मीटर अंतरावर आढळून आला. मुलीचा मृतदेह पाहून तिच्या आईने एकच आक्रोश केला. वारंवार बिबट्याच्या हल्ल्यांमुळे अकोले तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले असून गावकऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे. तर वनविभागाने नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात PM किसानचा हप्ता २० जूनला जमा होणार का? महत्वाची माहिती आली समोर

Women Health: आई होण्यासाठी योग्य वय कोणतं? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

पुणे हादरले! पत्नीची निर्घृण हत्या करून पतीनेही संपवले आयुष्य; कारण वाचून पायाखालील जमीन सरकेल

Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; आता व्हीआयपी दर्शन बंद, काय आहे नेमका नियम?

SCROLL FOR NEXT