Solapur : भिशीच्या पैशातून नागरिकांची आर्थिक लूट; वर्षभरापासून फरार पती- पत्नी ताब्यात

Solapur News : फायनान्समध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवलं होत. मात्र पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर १३१ जणांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद
Solapur News
Solapur NewsSaam tv
Published On

सोलापूर : अनेक महिला या दर महिन्याची भिशी काढत पैशांची गुंतवणूक करत असतात. मात्र अशा पद्धतीने सोलापुरात भिशीच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या पती- पत्नी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मागील वर्षभरापासून हे पती- पत्नी फरार होते. आता दोघेही पोलिसांच्या ताब्यात सापडले असून त्यांची चौकशी सुरु आहे. 

सोलापुरात भिशीच्या माध्यमातून फसवणुकीचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक नागरिकांशी संपर्क साधून भिशीच्या स्वरूपात पैशांची गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले होते. मात्र भिशीच्या माध्यमातून नागरिकांना करोडो रुपयांची फसवणूक केल्याची पती- पत्नी विरोधात तक्रार करण्यात आली होती. यानंतर दोघेही गेल्या वर्षभरापासून फरार होते. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता. 

Solapur News
Shahapur : दारूच्या नशेत विहीरीत उडी; एका व्यक्तीचा मृत्यू, पोलीस येताच गावकरी आक्रमक

२ कोटी ६९ लाख रुपयांची गुंतवणूक 

श्री ओम साई फायनन्सचा मालक रमेश अंबादास चिप्पा आणि पत्नी सुजाता रमेश चिप्पा यांनी २०२० ते २०२४ दरम्यान भिशी चालवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. श्री ओम साईनाथच्या माध्यमातून जवळपास १३१ ठेवीदारांकडून दोन कोटी ६९ लाख १९ हजार रुपयांची आमिष दाखवून ठेवी ठेवल्या होत्या. त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी गुंतवणूक करत रक्कम दिली होती. 

Solapur News
Farmer Rasta Roko : चोपडा तालुका मदतीपासून वगळला; बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर शेतकऱ्यांचा रस्ता रोको

१७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

पती- पत्नीने फायनान्समध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवलं होत. मात्र त्यानंतर पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवाजी लक्ष्मण पवार यांच्यासह १३१ जणांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे. त्यांना १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com