Shahapur : दारूच्या नशेत विहीरीत उडी; एका व्यक्तीचा मृत्यू, पोलीस येताच गावकरी आक्रमक

Shahapur News : पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विहीरीतून मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांनी मृतदेह काढण्यास तीव्र विरोध केला आक्रमक झालेल्या गावकऱ्यांसमोर पोलीस हतबल झाले होते
Shahapur News
Shahapur NewsSaam tv
Published On

फैय्याज शेख 
शहापूर
: दारूचे व्यसन असल्याने आज दारू पिल्यानंतर नशेत एका व्यक्तीने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत जो पर्यंत दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई होत नाही. तो पर्यंत विहीरीतून मृतदेह काढू देणार नाही; अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने किन्हवली पोलिसांच्या नाकीनऊ आले होते.  

शहापूर तालुक्यातील टेंम्भूर्ली गावातील कातकरी वाडीतील देवराम रामू रन असे घटनेत मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. देवराम याला दारूची नशा होती. आज देखील गावातील दारू विक्रेत्याकडून दुपारी एक वाजेच्या सुमारास दारू घेत प्यायली. यानंतर दारूची नशा चढल्याने दारूच्या नशेतच त्याने गावातील विहीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. यात त्याचा मृत्यू झाला आहे.  

Shahapur News
Ahilyanagar Corporation : अहिल्यानगर मनपा निवडणूक प्रक्रिया रेंगाळणार; अंतिम प्रभाग रचना जाहीर न झाल्याने प्रक्रिया न्यायालयात जाण्याची शक्यता

गावकर्यांनी घेतली आक्रमक भूमिका 

घटनेची माहिती किन्हवली पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विहीरीतून मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांनी मृतदेह काढण्यास तीव्र विरोध केला. जोपर्यंत दारू विक्रेत्यांवर कारवाई करत नाही तोपर्यंत मृतदेह विहिरीतून काढू दिला जाणार नाही; अशी भूमिका घेतल्याने पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. शेवटी दारू विक्रीत्यांवर कारवाईला सुरुवात केल्यानंतर विहीरीतून मृतदेह बाहेर काढून शहापूर येथील जिल्हा उप रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Shahapur News
Nagpur Crime : रेल्वेतून सोने- चांदी तस्करीचा डाव फसला; ३ कोटी रुपयांचे दागिने जप्त, एकजण ताब्यात

गावात सर्रास दारू विक्री 

शहापूर तालुक्यातील टेंम्भूर्ली गावात सर्रासपणे दारूची विक्री केली जात असते. यामुळे अनेकांना व्यसन लागले असून या दारूच्या अड्ड्यावर ठाण मांडून असतात. दरम्यान या विरोधात गावकर्यांनी अनेकदा गावात दारूबंदीची मागणी करण्यात आली होती. मात्र पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नसल्याने आजच्या घटनेनंतर गावकर्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com