Nagpur Crime : रेल्वेतून सोने- चांदी तस्करीचा डाव फसला; ३ कोटी रुपयांचे दागिने जप्त, एकजण ताब्यात

Nagpur News : सोने- चांदीच्या दरात रोज वाढ होत असून विक्रमी दर झाले आहेत. अशात रेल्वेतील गर्दीचा फायदा घेत सोने- चांदीच्या दागिन्यांची तस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
Nagpur Crime
Nagpur CrimeSaam tv
Published On

पराग ढोबळे 
नागपूर
: दिवाळी सणाच्या अनुषंगाने रेल्वेने प्रवाशांची मोठी गर्दी आहे. या दिवाळीच्या धामधुमीत रेल्वेतून सोन्या चांदीची तस्करी करण्यात येत होती. मात्र तस्करीचा हा मोठा डाव दक्षिण पुर्व मध्य रेल्वेच्या सुरक्षा रक्षकाने उधळून लावण्यात आला आहे. या कारवाईत रेल्वेतील एका प्रवाशांकडून तब्बल ३ कोटी ३७ लाख रुपये इतक्या किंमतीचे सोने व चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.

आठ दिवसांवर दिवाळी आली आहे. यामुळे रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाले असून आतापासूनच गर्दी वाढली आहे. या गर्दीचा फायदा घेत सोने- चांदीची तस्करी केली जात होती. सोने- चांदीच्या दरात रोज वाढ होत असून विक्रमी दर झाले आहेत. अशात रेल्वेतील गर्दीचा फायदा घेत सोने- चांदीच्या दागिन्यांची तस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. कारवाईमुळे तस्करी करणाऱ्याच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. 

Nagpur Crime
Washim : अट्टल मोटरसायकल चोरटा ताब्यात; ९ मोटरसायकल जप्त, रिसोड पोलिसांची कारवाई

३ कोटी ३७ लाखाचे दागिने जप्त 

रेल्वेतून प्रवास करत असलेल्या एक प्रवाश्याकडून तब्बल ३ कोटी ३७ लाख रुपयाहून अधिक किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या ऐवजात २ किलो ६८३ ग्रॅमची बिस्किटे, मंगळसूत्र, कडे, दागिने तर ७ किलो ४४० ग्रॅम चांदी ज्यामध्ये नाणी, पैजण, बिस्कीट, दागिने अशी तब्बल ३ कोटी ३७ लाख रुपयांची ऐवज जप्त करण्यात आली आहे. तर गोंदिया येथील एका गोल्ड सप्लायरला अटक करण्यात आली आहे. आता हे प्रकरण डिआरडीआयच्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आले आहे.

Nagpur Crime
Ahilyanagar Corporation : अहिल्यानगर मनपा निवडणूक प्रक्रिया रेंगाळणार; अंतिम प्रभाग रचना जाहीर न झाल्याने प्रक्रिया न्यायालयात जाण्याची शक्यता

सोने चोरीचा छडा

धाराशिव : दोन महिन्यांपूर्वी लोकमंगल मल्टीस्टेट बँकेच्या तुळजापूर शाखेत चोरी झाली होती. बँकेतील ३४ लाख ६० हजारांची रोकड आणि २ किलोहून अधिक सोने चोरीचा छडा लावण्यात यश मिळाले आहे. या प्रकरणी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत  नागपूरमधून चोराच्या मुस्क्या आवळल्या आहेत. अटकेनंतर आरोपीकडून ११ लाखांची रोकड आणि २ किलो सोने जप्त करण्यात आले असून बँकेची डुप्लिकडेट चावी मिळवत चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com