Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : दुचाकीस्वाराला वाचविण्यात कार पलटी; पाच जण जखमी

Ahilyanagar News : बाभळेश्वर- श्रीरामपूर महामार्गावर दुचाकीस्वाराला वाचवताना गाडी खड्ड्यात पडल्याची घटना घडली. अपघातात पाच तरुण जखमी. जखमींपैकी दोघे गंभीर जखमी असल्याने नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 
राहाता (अहिल्यानगर)
: महामार्गावर समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवताना कार थेट रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना राहाता तालुक्यातील नांदूर शिवारात घडली आहे. या अपघातात गाडीत बसलेले पाच तरुण जखमी झाले आहेत. अपघातात जखमी तरुणांना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोन जण गंभीर जखमी आहेत. 

बाभळेश्वर- श्रीरामपूर महामार्गावर नांदूर परिसरात एका दुचाकीस्वाराला वाचवताना गाडी खड्ड्यात पडल्याची घटना घडली. या अपघातात जखमी पाचही तरुण श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील रहिवासी असल्याचे समजते. तर दुचाकीस्वार देखील जखमी झाला आहे. या अपघातात पाच तरुण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोघे गंभीर जखमी असल्याने नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात कार पलटी 

दुचाकीस्वार बाबळेश्वरकडून श्रीरामपूरच्या दिशेने जात होता. तर स्कॉर्पिओमध्ये पाच तरुण श्रीरामपूरहून बाबळेश्वरच्या दिशेने जात होते. दरम्यान सदर दुचाकीचे ब्रेक खराब असल्याने समोरून कार आली असता ब्रेक न लागल्याने त्याला वाचविताना कारने पलटी घेत रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. प्रथमदर्शनी पाहिले असता दुचाकीचे मागील ब्रेक पॅन्डल रबर ट्यूबने बांधले असल्याचे निदर्शनास आले.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी 
भंडारा : भंडाऱ्याच्या तुमसर येथून गोंदियाच्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी चालकाचा नियंत्रण सुटल्याने चारचाकी गाडी पलटी होऊन अपघात झाला आहे. सदरचा अपघात तुमसर- गोंदिया महामार्गावरील गणेश लॉन समोर घडला. दरम्यान गाडी पलटी झाल्यानंतर सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. मात्र अपघातानंतर चालक फरार झाला आहे. घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील तपास व कारवाई सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

SCROLL FOR NEXT