Aheri Election result 2024  google
महाराष्ट्र

Aheri Election result 2024 : अहेरीत बाप विरूद्ध मुलगी लढत, धर्मरावबाबा अत्राम यांनी केला मुलीचा पराभव

Maharahstra Assembly Election Result 2024: राजकारणातील कौटूंबीक वाद हे निवडणूकीच्या रिंगणातही एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करतात हे काही नवीन नाही. पवार कुटुंबियात पडलेली फूट याचे उत्तम उदाहरण आहे.

Dhanshri Shintre

Aheri : राजकारणातील कौटूंबीक वाद हे निवडणूकीच्या रिंगणातही एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करतात हे काही नवीन नाही. पवार कुटुंबियात पडलेली फूट याचे उत्तम उदाहरण आहे. नंदा-भावजय, काका-पुतण्या, पती-पत्नी यांच्यामध्ये होत असलेल्या निवडणूकीच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. अशातच अहेरी मतदार संघही यंदा विषेश चर्चेचा विशय ठरला. धर्मराव बाबा अत्राम यांच्या विरूद्ध त्यांची मुलगी भाग्यश्री अत्राम या निवडणूकीच्या रिंगणात प्रतिस्पर्धी होत्या. ही लढत अतिशय चुरशीची होती. निवडणूकीआधी धर्मरावबाबा अत्राम यांनी मुलगी आणि जावयावर अनेक आरोप केले होते. कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला होता. 

असाच एक प्रकार कन्नड मतदार संघातही पाहायला मिळाला. रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव या पती पत्नीमध्ये निवडणूकीचा सामना होता. संजना जाधव यांनी पती हर्षवर्धन जाधव यांच्यावर अनेक गंभीर आरोपही केले होते. निवडणूकीच्या प्रचारादरम्यान त्या रडल्या होत्या. त्यांचे हे भाषण चर्चेचा विषय ठरले. दुसरीकडे अहेरीमध्येही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. 

महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाग्यश्रीचे बंड रोखण्यासाठी स्वतः प्रयत्न केले होते. यासाठी अजित पवार गडचिरोलीत आले होते, मात्र भाग्यश्रीने ते मान्य केले नाही. अहेरी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर ठाम राहिले. तिकीट न मिळाल्याने त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तुतारी या चिन्हावर निवडणूक लढविली.

धर्मरावबाबा अत्राम यांचा दणदणीत विजय

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार धर्मराव आत्राम यांचा दणदणीत विजय झाला. त्यानंतर आत्राम व त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. निकाल जाहीर झाल्यानंतर धर्मराव आत्राम यांनी नाचून आनंद व्यक्त केला.  माध्यमांना प्रतिक्रीया देतांना ते म्हणाले, बाप बाप होता है माझा विजय माझ्या निश्चित होता.

अशी आहे मतांची आकडेवारी

2019च्या विधानसभा निवडणुकीत अहेरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा अत्राम विजयी झाले होते. त्यांना 60 हजार 13 मते मिळाली होती. त्यांनी भाजपचे अंबरीशराव राजे अत्राम यांचा पराभव केला होता. आता त्यांना 53978 मते मिळाली. त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना 35569 मते मिळाली. अपक्ष उमेदवार राजे अंबरीश यांनी 37121 मते घेतली.

Edited by- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT