Murder 
महाराष्ट्र

निर्दयी बापाने हात– पाय बांधून मुलाची केली हत्‍या; परस्‍पर विल्‍हेवाट

निर्दयी बापाने हात– पाय बांधून मुलाची केली हत्‍या; परस्‍पर विल्‍हेवाट

गोविंद साळुंके

अहमदनगर : जन्मदात्या पित्याने आपल्या नऊ वर्षे वयाच्या मुलाचे हात पाय बांधून त्‍यास काठीने मारहाण करून हत्या केली. इतकेच नाही तर झाडावरून पडून मुलाचा मृत्यू झाल्याचा बनाव करत परस्पर मृत्यूदेह दफन केल्याची घटना नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली आहे. (ahamadnagar-news-crime-news-father-tied-the-hands-and-feet-and-killed-the-child)

प्रवरासंगम (ता. नेवासा) येथील सागर शंकर पवार (वय ९) या बालकाच्या मृत्यूची अकस्मात नोंद १३ ऑक्टोंबरला नेवासा पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. सदर मृत्यूच्या चौकशी दरम्यान मुलाचे वडील शंकर पवार याने १३ ऑक्टोबरला सायंकाळी त्याच्या मुलाचे सागर पवार यांचे हातपाय बांधून काठीने मारहाण केली. तो बेशुद्ध पडल्याने त्याला नेवासा येथे रुग्णालयात नेले.

पण मुलाचा मृत्‍यू

बापाने काठीने केलेल्‍या मारहाणीत मुलगा बेशुद्ध पडला. यानंतर त्‍यास रूग्‍णालयात नेले असताना मुलगा मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र पित्याने परत येऊन परस्पर दफनविधी केला. त्यामुळे मुलाची हत्या करून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याने नेवासा पोलीस ठाण्यात जन्मदात्या पित्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

८ तास महत्त्वाचे; महाराष्ट्रासह १५ राज्यात वादळी पावसाची शक्यता; ६० किमी वेगाने वाहणार वारे, IMD चा अंदाज काय?

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या उमरखेडमध्ये स्फोटात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

Kalyan: लोकलमधून अचानक ट्रॅकवर पडली 24 वर्षीय तरुणी; रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

Pitru Paksh 2026 : पितृ पक्षात काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

निवडणूक आयोगाचा SIR संदर्भात मोठा निर्णय; महाराष्ट्रासह दिल्लीत दावे, हरकतींसाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT