agriculture news Unseasonal rains in Maharashtra caused damage to agricultural crops on 1 lakh hectares Saam TV
महाराष्ट्र

Unseasonal Rain: राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा; लाखो हेक्टरवरील पिकांची माती, बळीराजा संकटात

Maharashtra Unseasonal Rain: अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतीपिकांना मोठा तडाखा दिला आहे. राज्यातील अंदाजे १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

Satish Daud

Maharashtra Unseasonal Rain Damages

सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतीपिकांना मोठा तडाखा दिला आहे. राज्यातील अंदाजे १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना समावेश आहे. सरकारने तातडीने नुकसानीची पाहणी करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अवकाळी पावसाच्या आपत्तीमुळे राज्यभरात आतापर्यंत ६ नागरिकांचा मृत्यू झाला असून, १६१ लहान मोठी जनावरे दगावली आहेत. याशिवाय खरीप हंगामातील कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळींब, काढणीस आलेला भात, ज्वारी, गहू, हरभरा पिके मातीत गेली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, प्रशासानाने नुकसानाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. अवकाळीमुळे ज्या भागात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तिथे मदत करण्यासाठी सरकार खंबीरपणे उभे आहे, असं कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अवकाळीचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसला आहे. मराठवाड्यातील ५९८ गावांमध्ये ४७ हजार १०९ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय १८० लहान-मोठय़ा व ओढकाम करणाऱ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यानुसार नुकसानीचा प्राथमिक अंदाज

  • बुलडाणा जिल्ह्यात अवकाळीमुळे ३३ हजार हेक्टर शेतीचं नुकसान.

  • नाशिक जिल्ह्यात ३२ हजार ८३३ हेक्टर शेतीपिके पाण्यात.

  • अहमदनगर जिल्ह्यात १५ हजार ३०७ हेक्टर शेतीपिकांचं नुकसान.

  • जालना जिल्ह्यातील ५ हजार २७९ हेक्टर क्षेत्रावर नुकसान.

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये ४ हजार २०० हेक्टर शेतीचं नुकसान.

  • पुणे जिल्ह्यात ३ हजार ५०० हेक्टर शेतीचं नुकसान.

  • नंदुरबार जिल्ह्यात २ हजार २३९ हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे.

याशिवाय सोलापूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, वर्धा आणि भंडारा जिल्ह्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. उर्वरीत जिल्ह्यांमधील आकडेवारी येणे अद्याप बाकी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT