Cotton Price Today Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Cotton Market Rate: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, पांढऱ्या सोन्याच्या दरात सुधारणा; वाचा किती मिळतोय भाव

Cotton Rate in Maharashtra: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. कारण, कापसाचे भाव आता हळूहळू वाढण्यास सुरूवात झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Cotton Price Today Maharashtra: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. कारण, कापसाचे भाव आता हळूहळू वाढण्यास सुरूवात झाली आहे. सोमवारी राज्यातील काही बाजारामध्ये कापसाला जवळपास ८ हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत होता. तर कापसाची सरासरी दरपातळी ७ हजार ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होती.  (Latest Marathi News)

गेल्यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस कापसाला साधारण १२ ते १३ हजार रुपये इतका भाव मिळाला होता. यावर्षी सुद्धा कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाच्या पिकाची लागवड केली. दिवाळीआधी कापसला ९ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळत होता. मात्र, दिवाळी आली अन् कापसाचे भाव गडगडले.

आज ना उद्या कापसाचे भाव (Cotton Rate) वाढतील आणि आपल्या डोक्यावरील कर्जाचं ओझं कमी होईल, या आशेने आजवर अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला. बाजारपेठेत कापसाला हवा तसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अन्न पाणीही गोड लागेनासं झालं. त्यातच वाढत्या तापमानामुळे कापसाच्या वजनातही घट झाली. आता पेरणीची वेळ तोंडावर असताना देखील अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे.

परभणीत कापसाच्या दरात सुधारणा

परभणी (Parbhani) जिल्ह्यातील मानवत, सेलू, परभणी या कापसाच्या प्रमुख बाजार पेठांमध्ये कापसाच्या कमाल दरात गेल्या काही दिवसांत ५०० ते ७०० रुपयांनी सुधारणा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा परत पल्लवित झाल्या आहेत. मानवत बाजार समितीमध्ये कापसाला प्रतिक्विंटल किमान ५६०० ते कमाल ७५२० रुपये तर सरासरी ७४०० रुपये दर मिळत आहे.

अकोल्यात कापसाला मिळाला ८ हजार रुपये भाव

कापसाच्या कमाल भावाने काही बाजारांमध्ये ८ हजारांचा टप्पा गाठला. सोमवारी अकोल्यातील अकोट बाजारात (Akola News) कापसाला कमाल भाव ८ हजार १४० रुपये मिळाल्याची माहिती आहे. अर्थातच हा भाव सर्वच मालाला मिळाला नाही. लांब धाग्याच्या गुणवत्तापूर्ण कापसाला हा भाव मिळाला.

कापसाचे भाव वाढणार का?

दरम्यान, यापुढील काळात कापसाची आवक आणखी कमी होत जाणार आहे. तसेच आता जास्त दिवस थांबू शकतील, अशाच अगदी थोड्या शेतकऱ्यांकडे (Farmer) कापूस शिल्लक आहे. हे शेतकरी सध्याच्या भावात कापूस विकण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे दरात आणखी सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Nanded: साखरझोपेत आभाळ फाटलं; ६ गावांना पुराचा वेढा, ४०-५० म्हशींचा मृत्यू, थराराक VIDEO

Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT