सांगली : सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या पंचनाम्यामध्ये प्रशासनाकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे. पंचनामे योग्य पद्धतीने करण्यात यावेत या मागणीसाठी 17 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे. सांगलीमध्ये पार पडलेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकी मध्ये ते बोलत होते. (agitation on 17th August for the demands of Sangli flood victims)
हे देखील पहा -
सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या नुकसानीच्या पंचनाम्यात सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. अद्याप मदत मिळाली नाही, तसेच मनमानी पद्धतीने पंचनामे करण्यात येत असल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने या विरोधात आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे. यासाठी सांगलीमध्ये माजी कृषी राज्यमंत्री व आमदार सदाभाऊ खोत आणि सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीला अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये वारणा आणि कृष्णाकाठी महापुराने प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई शासनाकडून देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. ही मदत जरी तोकडी असली तरी पूर्ण मिळायला हवी. मात्र जिल्ह्यात प्रशासनाकडून जे पंचनामे सुरू आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. पूरग्रस्त नागरिकांचे पंचनामे करताना अधिकाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे.
जिल्हाधिकारी कोणाचे ऐकत नाहीत तर अद्याप नुकसान भरपाई नियोजनबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांनी एकही बैठक घेतली नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा हा सर्व प्रकार आहे. अशा पद्धतीने कोणत्याही पुरग्रस्तांना मदत मिळणार नाही. त्यामुळे सरकारवर दबाव आणण्यासाठी आता आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असं स्पष्ट करत पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी 17 ऑगस्ट रोजी सांगलीतील स्टेशन चौक येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जाहीर केले आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.