राज्‍य सरकार स्‍वतःच्‍या हातानेच पाठ थोपटून घेतेय; माजी मंत्री गिरीश महाजन यांचा आरोप

राज्‍य सरकार स्‍वतःच्‍या हातानेच पाठ थोपटून घेतेय; माजी मंत्री गिरीश महाजन यांचा आरोप
Girish Mahajan
Girish Mahajan
Published On

जळगाव : दोन वर्षांपासून आघाडी सरकार राज्‍यात काम करतेय. परंतु, या दोन वर्षात कोणतेही नवीन काम सरकारने सुरू केलेले नाही. केवळ नाव देवून श्रेय लाटण्याचे काम सरकार करत आहे. तरी देखील आपण राज्‍यात सर्वोत्‍कृष्‍ट मुख्‍यमंत्री म्‍हणून मिरवून घेत असून, आपली पाठ स्‍वतःच्‍याच हाताने थोपटून घेणारे सरकार असल्‍याचा आरोप माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. (jalgaon-news-bjp-leader-Former-Minister-Girish-Mahajan-allegation-state-government)

भाजपच्या वसंत स्मृती या जिल्‍हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

उत्‍तर महाराष्‍ट्रातील सर्व काम बंद पाडली

जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रकल्पाना भाजप सरकारने परवानगी मिळाली होती. ते कामे सुरू देखील झाले होते. मात्र अनेक धरण प्रकल्पांची सुरू असलेली कामे या सरकारने बंद पाडली. ९० टक्‍के काम झालेल्‍या वाघूर धरणासाठी सध्याच्या सरकारने 'दमडी' सुद्धा दिली नसल्याचा आरोप आमदार महाजन यांनी केला. आघाडी सरकार नसून बिघाडी सरकार आहे. सर्व बाजूनी फेल झाले असून भूलथापा मारण्याचे काम राज्य सरकार करीत असल्याची टीकाही महाजन यांनी केली.

Girish Mahajan
कृषिकन्‍येची निसर्गाच्‍या बदलावर मात; सेंद्रीय शेतीतून वर्षासाठी पंधरा लाखाचे उत्‍पन्‍न

कार्यक्रम घेताय मग मंदीर बंद का?

राज्‍यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. यानंतर सरकारमधील तीन पक्ष रॅली काढताय, हजारो नागरीक जमवून कार्यक्रम घेताय; त्‍यावेळी कोरोना पसरत नाही का? असे असताना मग मंदीर बंद का ठेवलीत? मंदीर उघडल्‍यानंतरच कोरोना पसरेल का? असा सवाल त्‍यांनी उपस्‍थीत केला.

सरकार नुसती चमकोगिरी करतेय : आमदार भोळे

आघाडी सरकारमधील नेते दौरे करत आहेत. परंतु, त्‍यांना जनतेपर्यंत पोहचण्यासाठी वेळ नाही. जिल्‍ह्यात राज्‍याच्‍या महिला व बालकल्‍याण मंत्री दौरा करून गेले. पण यावल तालुक्‍यात कुपोषणाने मृत्‍यू झालेल्‍या बालकाच्‍या परिवारापर्यंत त्‍यांना जायला वेळ नव्‍हता. या सरकारची काम करण्याची नैतिकता नाही. केवळ चमकोगिरी करायची असून, तीन चाकी सरकार कसे टिकेल यासाठीच प्रयत्‍न करत असल्‍याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com