जुन्या पेन्शन योजनेसाठी माध्यमिक शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

जुन्या पेन्शन योजनेसाठी माध्यमिक शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

जुनी पेन्शन योजना राबवा आणि राष्ट्रीय पेन्शन योजना हटवा या मागणीसाठी माध्यमिक शाळेच्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर,रायगड

रायगड: राष्ट्रीय पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करा, शिक्षकांच्या वेतनातील त्रुटी सोडवाव्यात, शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांच्या असलेल्या समस्या सोडवाव्यात या मागण्यासाठी आज अलिबाग येथे जिल्हा परिषदेसमोर जिल्हा माध्यमिक शाळेच्या शिक्षकांनी धरणे आंदोलन केले आहे. (agitation of secondary school teachers in front of alibaug Zilla Parishad for old pension scheme)

हे देखील पहा -

यावेळी शिक्षकांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून भ्रष्ट कारभाराबाबत निषेध व्यक्त केला. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन शिक्षक शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी यांना दिले. शाळेतील शिक्षकांनी काळ्या फिती लावून आंदोलनात सहभाग घेतला. माध्यमिक शिक्षकांचे आजचे धरणे आंदोलन हे राज्यभर आज करण्यात आले. अलिबाग जिल्हा परिषदेसमोर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने कोकण अध्यक्ष नरसु पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन करण्यात आले. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी आंदोलन, मोर्चे, कामबंद आंदोलन करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहेत.

शासनाने शिक्षकांच्या मागण्या लवकरात लवकर सोडवाव्यात आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी इतर राज्यांनी केंद्राकडे विधानसभा ठरावाद्वारे शिफारसी केल्या आहेत. महाराष्ट्र शासनानेही तशी शिफारस तात्काळ करावी, केंद्राप्रमाणे सर्व लाभ मिळावे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या, रक्कम आणि सातव्या वेतन आयोगाचा फरकाचा पहिला थकीत हफ्ता त्वरित मिळावा या मागण्याचे निवेदन शिक्षणाधिकारी यांना दिले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT