मुंबई: राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी सोशल मीडियावर भंगारवाला म्हणून ट्रोल करण्यात येत आहे. अशा ट्रोलर्संना त्यांची मुलगी सना मलिक-शेख (Sana Malik-Shaikh) यांनी सडेतोड उत्तर दिलंय. "होय मी भंगारवाल्याची मुलगी! मला अभिनान आहे, मी मराठी मुलगी"असं ट्विट त्यांनी केलं आहे. तसेच नवाब मलिक माझे हिरो असा हॅशटॅग त्यांनी वापरलाय. नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी हे ट्विट केलंय. (Yes, I am the daughter of a bhangarwala! Proud to be a Marathi girl - Malik's daughter's tweet)
हे देखील पहा -
मंत्री नवाब मलिक हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede NCB) यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत असताना मलिकांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातयं. ज्यात प्रामुख्याने भाजप समर्थक ट्रोलर्स (BJP Trollers) प्रामुख्याने दिसून येतात, ते मलिकांना भंगारवाला म्हणून त्यांना ट्रोल करत असताता. आज मात्र नवाब मलिकांनीही या ट्रोलर्संना सडेतोड उत्तर दिलं. ''होय, मी भंगारवाला आहे असं म्हणत ते विरोधकांना म्हणाले की, "भंगारवाल्याची किमयागिरी यांना माहीत नाही. जी वस्तू उपयोगी नसते, त्याचे तुकडे करून भट्टीत टाकून त्याचे पाणी करतो. नवाब मलिक या शहरातील भंगार काढून त्यांचे नट बोल्ट काढून त्यांचे पाणी बनवणार" असा इशाराच त्यांनी विरोधकांना दिला होता. आता मात्र मलिकांच्या समर्थनात त्यांची मुलगी सना या देखील मैदैनात उतरल्या आहेत.
नवाब मलिकांच्या मुलीने भंगारवाल्याची मुलगी असल्याचं सांगत मला त्याचा अभिनान आहे असं त्या म्हणाल्या आहेत. सोबतच मी मराठी मुलगी (Proud Marathi Girl) आहे असंही त्यांनी आवर्जून सांगितलं आहे. वानखेडे कुटुंबियांनी मराठी असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं होतं. त्यांच पार्श्वभूमीवर मलिकांनीदेखील मराठी असल्याचा मला अभिमान असून माझं कुटुंब ७० वर्षांपासून महाराष्ट्रात राहतं असं ते म्हणाले होते. मलिकांच्या याच भुमिकेबद्दल आता त्यांची मुलीनेही त्यांना समर्थन दिलं आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.