महाराष्ट्र

Dhananjay Munde: आमदार झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; दोघांच्या भेटीत काय चर्चा झाली? वाचा

Dhananjay Munde: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दमदार विजय मिळवला आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Dhanshri Shintre

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दमदार विजय मिळवला आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा दारुण पराभव केला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी तब्बल १ लाख ४० हजार २२४ पेक्षा अधिक मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला. धनंजय मुंडे झंझावातापुढे राजेसाहेब देशमुख टिकू शकले नाहीत. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी मिळवलेल्या या यशाचे जोरदार कौतुक होत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी परळीसह बीड जिल्ह्यातील युतीच्या महाविजयाबद्दल अभिनंदन धनंजय मुंडे यांचं अभिनंदन केलं. धनंजय मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महायुतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल श्री फडणवीस यांच्या सत्कार करून अभिनंदन केले. मात्र, फडणवीस यांनी परळीसह बीड जिल्ह्यातील युतीच्या महाविजयाबद्दल 'माझ्या घरी आलात तर माझा नियम चालणार, यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...' असे म्हणत आधी धनंजय मुंडे यांचा सत्कार केला.

महायुतीच्या बीड जिल्ह्यातील परळीसह महाविजयाबद्दल अभिनंदन केले व पाठीवर कौतुकाची थाप मारली. धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावेळी भाजप नेते गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर उपस्थित होते. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे हे दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. धनंजय मुंडे यांनी 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT