Swine Flu google
महाराष्ट्र

Swine Flu : नंदुरबार जिल्ह्यातील डुक्करांमध्ये आढळला अफ्रिकन स्वाइन फ्लू

Swine Flu : गेल्या आठवड्यात शहादा तालुक्यातील म्हसावदमध्ये झाला होता शंभरहुन अधिक डुक्करांचा अचानक मृत्यू झाला होता. त्यानंतर भोपाळच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणी नमूने पाठवण्यात आले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(सागर निकवाडे, नंदुरबार)

African swine Flu In Nandurbar

नंदुरबार जिल्ह्यात अफ्रिकन स्वाइन फ्लूचा शिरकाव झालाय. नंदुरबार जिल्ह्यातील डुक्करांमध्ये अफ्रिकन स्वाईन प्ल्यूचे लक्षण आढळून आली आहेत. गेल्या आठवड्यात शहादा तालुक्यातील म्हसावदमध्ये झाला होता शंभरहुन अधिक डुक्करांचा अचानक मृत्यू झाला होता. त्यानंतर भोपाळच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणी नमूने पाठवण्यात आले होते.(Latest News)

या नमुन्याचा अहवाल आल्यानंतर डुक्करांना अफ्रिकन स्वाइन फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. अहवाल येताच प्रशासनाने म्हसावद आणि लगतचे १० किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित घोषीत केले आहे. या परिसरातील डुक्कांराची शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग प्रक्रिया होणार आजपासून त्याला झाली सुरूवात झालीय. या आजाराचा मानवी जीवनावर काही परिणाम होणार नसला तरी याची लागन झालेल्या डुकांराचा मृत्यू होत असतो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केरळमध्ये आढळला होता स्वाइन फ्लू

दरम्यान प्रत्येक वर्षी देशात अफ्रिकन स्वाइन फ्लू येत असल्याचं दिसत आहे. मागील सहा महिन्यापूर्वी केरळमध्ये सुद्धा प्लू आढळला होता. गेल्या काही वर्षांत, केरळ व्यतिरिक्त, त्याचा संसर्ग आसाम, बिहार, मध्य प्रदेश, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये हा प्ल्यू पसरला होता. देशात सर्वाधिक डुकरांची संख्या आसाममध्ये आढळते.

दरम्यान हा आजार मानवाला देखील लागत असतो. स्वाइन फ्लू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये सहज पसरतो. हे सामान्य फ्लू किंवा सर्दीसारखे आहे. खोकला, शिंकणे किंवा श्वासोच्छवासाद्वारे पसरवा. स्वाइन फ्लूचा रुग्ण दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्याला हा आजार होण्याची शक्यता असते. स्वाइन फ्लूची लक्षणे साधारणपणे सर्दीसारखीच असतात परंतु त्यात श्वास लागणे, अंगदुखी आणि अशक्तपणा यांचा समावेश होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

SCROLL FOR NEXT