Maratha Reservation: मोठी अपडेट! राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल उद्या सरकारसमोर सादर होण्याची शक्यता

Maratha Reservation : या अहवालामध्ये मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध होते अशी शिफारस असण्याची शक्यता आहे. आयोगाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध होत असल्याचा अहवाल दिला जाण्याची शक्यता आहे.
Maratha Reservation
Maratha Reservation
Published On

(नितीन पाटणकर, मुंबई )

Maratha Reservation State Backward Class Commission Report :

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट समोर आलीय. राज्य मागासवर्ग आयोगाचा सर्व्हे पूर्ण झालाय. आयोग उद्याच राज्य सरकारसमोर हा अहवाल सादर करणार असल्याचं माहिती सुत्रांनी दिलीय. या अहवालामध्ये मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध होते अशी शिफारस असण्याची शक्यता आहे. आयोगाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध होत असल्याचा अहवाल दिला जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राज्य मागासवर्ग आयोगाची मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये सध्या बैठक सुरू आहे. (Latest News)

मराठा समाजाला आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल तयार केला असून तो अहवाल उद्या सरकारसमोर सादर केला जाणार आहे. या अहवालात मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. आयोगाची शिफारस राज्य सरकार स्वीकारून मराठा आरक्षणासाठी बोलवलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा संमत करण्याची शक्यता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र अहवालावरून सर्व सदस्यांमध्ये एकमत होत नसल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. दरम्यान याप्रकरणी राज्य मागासवर्ग आयोगाची मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये सध्या बैठक सुरू आहे. अध्यक्षांसहित सदस्य देखील या बैठकीला उपस्थित आहेत. आयोगातील तीन सदस्य अहवालाशी सहमत नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य सरकारला सादर करणं रखडलंय. आधी अहवाल अवलोकनासाठी देण्यात यावा. अहवालाचे अवलोकन केल्यानंतरच सह्या करु, अशी या सदस्यांची भूमिका आहे. दरम्यान जर सर्व सदस्यांचे एकमत झाल्यास आज रात्रीच अहवाल सरकारला सादर करण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिलीय.

जरागे यांच्यावर उपचार सुरू

न्यालयाच्या आदेशानुसार आमच्या देखरेखीत मनोज जरांगे यांच्यावर उपचार करावे, असे आदेश होते त्या आदेशानुसार डॉक्टरांच्या टीमला मान देवून त्यांनी उपचार घेण्यास सुरूवात केलीय. त्यांची तब्बेत ठीक नसल्याने त्यांना संध्या त्यांना आयव्ही चालू केलीय. त्याचबरोबर व्हिटामिनचे इंजेक्शन दिले आहे. जरांगेंच्या ब्लड आणि युरीन सॅम्पल घेण्यात आले ते रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचार केला जाणार आहे.

Maratha Reservation
Maratha Aarkshan : तर मुंबईला जाऊन सरकारला साडी चोळीचा आहेर देणार; मराठा आरक्षणावरून महिला आक्रमक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com