Gunratna Sadawarte Saam
महाराष्ट्र

गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला, जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक, नेमकं काय घडलं?

Gunratna Sadawarte: जालन्यात सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला. घटनेवेळी पोलीस उपस्थित. गाडीचे किरकोळ नुकसान. व्हिडिओ व्हायरल.

Bhagyashree Kamble

  • गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला.

  • २ ते ३ अज्ञातांकडून गाडी अडवण्याचा प्रयत्न.

  • पोलिसांकडून अडवण्याच प्रयत्न.

जालन्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. दोन ते तीन व्यक्तींनी सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला केला. रस्त्यावरून सदावर्तेंची गाडी जात असताना अचानक २,३ लोक आलेत. त्यांनी सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यावेळी पोलीस तैनात उभे होते.

वकील गुणरत्न सदावर्ते आज धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांच्या भेटीसाठी जालना दौऱ्यावर आहेत. यावेळी रस्त्यावरून जात असताना त्यांच्यावर गाडीवर हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर मराठा आंदोलक असल्याची माहिती आहे. त्यांनी हल्ला करत गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला.

हल्लेखोरांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर उपस्थित पोलिसांनी धाव घेतली. तसेच पोलिसांनी हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी हल्लेखोरांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, गाडीचे किरकोळ नुकसान झाले असल्याची माहिती आहे.

दीपक बोऱ्हाडेंच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस

वकील गुणरत्न सदावर्ते धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांच्या भेटीसाठी जालन्यात दाखल झाले आहेत. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा हाती घेतला आहे. दीपक बोऱ्हाडे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fast Weight Loss: वजन कमी करायचं आहे? पण, हेवी डाईट नको; मग फॉलो करा या ६ सोप्या टिप्स

India Tourism: सोलनपासून हाकेच्या अतंरावर आहे स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन, ठिकाण पाहून मंत्रमुग्ध व्हाल

Navratri Festival: 'माय म्हणी अंबा माय! नवरात्रीत सप्तश्रृंगी गडावर धावणार जादा बसेस; कुठून अन् किती असतील बसेस?

गोंदियात ओबीसींचा एल्गार मोर्चा, मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी | VIDEO

Maharashtra Live News Update: मागील ११ वर्षात देशात २५ कोटी लोकांनी गरिबीला हरवलं आहे - PM मोदी

SCROLL FOR NEXT