Shraddha Walker case saam tv
महाराष्ट्र

Shraddha Walker Case : DNA रिपोर्टनंतर आफताबचं काय होणार? अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची महत्वाची प्रतिक्रिया

आफताबने अत्यंत शांत डोक्याने हा प्रकार केल्याचं यामध्ये दिसतंय, असं उज्वल निकम यांनी म्हटलं.

साम टिव्ही ब्युरो

Shraddha Walkar Case: दिल्लीच्या श्रद्धा वालकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी आफताब पुनावालाने जंगलात टाकलेल्या हाडांची डीएनए चाचणी पूर्ण झाली आहे. जंगलात सापडलेली हाडं श्रद्धाचीच असल्याची माहिती समोर आली आहे. हा पुरावा येत्या काळात नक्कीच महत्त्वाचा आणि निर्णायक ठरु शकतो असे, ज्येष्ठ वकील अॅड उज्वल निकम यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

पोलीस तपासात जेव्हा मानवी हाड सापडली होती तेव्ही ती श्रद्धाचीच आहेत का असा प्रश्न होता. मात्र आता याचा शोध पोलिसांनी आफताबच्या मदतीने घेतला आहे. यावरून आफताबने अत्यंत शांत डोक्याने हा प्रकार केल्याचं यामध्ये दिसतंय, असं उज्वल निकम यांनी म्हटलं. (Delhi Crime)

श्रद्धा वालकरच्या प्रकरणात श्रद्धाच्या वडिलांचा आणि श्रद्धाचे सापडलेले अवयव याचा डीएनए मॅच झाला आहे. त्यामुळे नक्कीच आरोपी आफताब याला अडचणी निर्माण होऊ शकतात. हा मिळालेला पुरावा नक्कीच येत्या काळात कामी येऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं.

पोलिसांच्या (Delhi Police) हाती लागलेल्या डीएनए रिपोर्टनुसार जंगलात सापडलेली हाडे श्रद्धाचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रद्धाच्या वडिलांसोबत डीएनए जुळल्याने याबद्दलचा खुलासा झाला आहे. त्यामुळे हा रिपोर्ट श्रद्धा हत्या प्रकरणात निर्णायक ठरणार आहे. तसेच देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा हत्याकांड प्रकरणाच्या तपासाला आता वेग येणार आहे.

दरम्यान क्रूरकर्मा आरोपी आफताब अमीन पूनावाला) याने वसईची श्रद्धा वालक हिची गळा आवळून हत्या केली. नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी नियोजनबद्ध कट रचला होता. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. ते फ्रिजमध्ये ठेवले. नंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप बांधली लग्नगाठ; PHOTO शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का, नवरा आहे तरी कोण?

Maharashtra News Live Update:कोजागरी पौर्णिमा निमित्त पुणे शहरातील उद्याने आज रात्री १२ पर्यंत सुरू राहणार

Weather Update : पाऊस धुमाकूळ घालणार! २० राज्यांना सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्रात कसं असेल आज हवामान? वाचा

Health Care : रात्रीचे जेवण आणि झोपण्यामध्ये किती अंतर असावे?

Sunday Horoscope : कामात नवी संधी मिळेल! ५ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT