Shraddha Walkar Case Today News: देशभरात श्रद्धा वालकर हत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. दिल्लीच्या श्रद्धा वायकरचा तिचा प्रियकर आफताब पुनावालाने गळा दाबून खून करत ३५ तुकडे करुन त्याने फ्रिजमध्ये ठेवले होते. ज्यानंतर रोज नवनव्या खुलाशाने पोलिसही चक्रावून गेले होते. संपूर्ण देशाला हादरवुन टाकणाऱ्या दिल्लीच्या श्रध्दा वालकर प्रकरणात सध्या एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी आफताब पुनावालाने जंगलात टाकलेल्या हाडांची डीएनए चाचणी पुर्ण झाली असून ही माहिती पोलिसांच्या तपासात निर्णायक ठरणार आहे. (Shraddha Walkar News In Marathi)
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या श्रध्दा वालकर (Shraddha Walkar) खून प्रकरणात रोज नवनवे अपडेट समोर येत असतानाच पोलिसांच्या हाती एक महत्वाचा पुरावा (evidence) लागला आहे. आरोपी आफताब पुनावालाने श्रद्धाचे तुकडे करून जंगलात फेकल्याचे पोलिसांना सांगितले होते. ज्यामधील काही हाडे पोलिसांच्या लागली होती. मात्र ही हाडे श्रध्दाचीच असल्याचे सिद्ध करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. ही हाडे डीएनए रिपोर्टसाठी पाठवण्यात आली होती. ज्याचे रिपोर्ट पोलिसांना मिळाले आहेत. (Latest Marathi News)
पोलिसांच्या (Delhi Police) हाती लागलेल्या डीएनए रिपोर्टनुसार जंगलात सापडलेली हाडे श्रद्धाचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रद्धाच्या वडिलांसोबत डीएनए जुळल्याने याबद्दलचा खुलासा झाला आहे. त्यामुळे हा रिपोर्ट श्रध्दा हत्या प्रकरणात निर्णायक ठरणार आहे.तसेच देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा हत्याकांड प्रकरणाच्या तपासाला आता वेग येणार आहे. दरम्यान क्रूरकर्मा आरोपी आफताब अमीन पूनावाला) याने वसईची श्रद्धा वालक हिची गळा आवळून हत्या केली. नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी नियोजनबद्ध कट रचला होता. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. ते फ्रिजमध्ये ठेवले. नंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते.
Edited By - Gangappa Pujari
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.