Ladki Bahin Yojana news Saam tv
महाराष्ट्र

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणीच्या अर्जांची नव्याने छाननी होणार का? आदिती तटकरे यांच्या वक्तव्याने धाकधूक वाढली

ladki bahin yojana news : लाडकी बहिणीच्या अर्जांची नव्याने छाननी होणार का, याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. योजनेवरील आदिती तटकरे यांच्या वक्तव्याने धाकधूक वाढली आहे.

Saam Tv

मुंबई : महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर लाडकी बहीण योजनेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नव्या महायुती सरकारची स्थापना झाल्यानंतर लाडकी बहिणीबाबत कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल होणार असल्याची चर्चा आहे. यावरून माजी मंत्री आदिती तटकरे यांनी मोठं भाष्य केलं आहे.

लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना आदिती तटकरे म्हणाल्या, लाडकी बहिण योजनेबाबत चुकीच्या बातम्या देण्यात आल्या. २ कोटी ४० लाख महिलापर्यंत लाभ पोहोचतो आहे. या योजनेद्वारे अडीच लाखांहून कमी उत्पन्न असल्यापेक्षा महिलांना लाभ मिळत आहे. या प्रकरणी कोणती विशेष तक्रार आलेली नाही. पण तक्रार आल्यास त्याचीच चौकशी करायची की नाही, यासंदर्भात शासन निर्णय घेईल'.

'या योजनेच्या अर्जाच्या छाननीचा प्रश्नच कुठे येत नाही. तक्रारी आल्यानंतर छाननी कशी करायची यासंदर्भातील निर्णय शासन करेल. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली त्यानंतर बोलताना त्यांनी सांगितले आहे. २१०० रुपयांचा लाभ कॅबिनेट बैठकीत ठरेल, असे तटकरे पुढे म्हणाल्या. यावेळी आदिती तटकरे यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली.

'लाडकी बहीण योजनेबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत. राज्यातील विरोधकांना नेहमीच ही योजना डोळ्यात खुपली आहे. विरोधकच संभ्रम पसरवतात, असं म्हणत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. लाडकी बहीण योजनेवरून आदिती तटकरे यांनी केलेल्या टीकेल्या महाविकास आघाडीचे नेते काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.

लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना आदिती तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेबाबत चुकीच्या बातम्या देण्यात आल्या. २ कोटी ४० लाख महिलापर्यंत लाभ पोहोचतो आहे. या योजनेद्वारे अडीच लाखांहून कमी उत्पन्न असल्यापेक्षा महिलांना लाभ मिळत आहे. या प्रकरणी कोणती विशेष तक्रार आलेली नाही. पण तक्रार आल्यास त्याचीच चौकशी करायची की नाही, यासंदर्भात शासन निर्णय घेईल'.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता हा जानेवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. तर २१०० रुपयांचा हप्ता हा दिवाळीपासून सुरु होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या योजनेच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर महिलांना जुन्या अर्जावर लाडक्या बहिणीच्या योजनेचा हप्ता मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 'खुर्च्या तोडण्यासाठी नको तर परिवर्तनासाठी नगरपालिका हवी' देवेंद्र फडणवीसांचा शिंदेसेनेला टोला

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT