dr indrajit mohite saam tv
महाराष्ट्र

Karad: 'यशवंतराव पतसंस्था' अवसायनात, इंद्रजीत मोहिते परदेशात; कराडसह वाळवातील शेतकऱ्यांच्या पैशांचे काय?

या संस्थेचे लेखापरीक्षण तीन वर्ष केलेलं नाही तसंच अगोदर केलेल्या लेखापारीक्षणातही त्रुटी आढळल्या आहेत.

संभाजी थोरात

Karad News :

कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्था (Yashwantrao Mohite Nagari Sahakari Patsanstha) आर्थिक अडचणीत असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरु होती. त्यातच या संस्थेवर अवसायक नेमण्याचा आदेश सहकारी संस्थाचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी काढला आहे. (Maharashtra News)

या संस्थेच्या 14 शाखा आहेत. एकूण 34 कोटीच्या ठेवी आहेत. कराड आणि वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पैसे या संस्थेत आहेत, मात्र गेल्या काही महिन्यापासून ठेवी परत दिल्या जात नसल्याची तक्रार होती. अखेर या संस्थेवर अवसायक नेमण्याचा आदेश सहकारी संस्थाचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी काढला आहे.

या संस्थेचे लेखापरीक्षण तीन वर्ष केलेलं नाही तसंच अगोदर केलेल्या लेखापारीक्षणातही त्रुटी आढळल्या आहेत. या कारणाने अवसायक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लेखापरीक्षक कमलेश पाचपुते यांना आवसायक म्हणून नेमले आहे. आता अवसायक नेमल्याने ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यशवंतराव मोहिते यांनी सहकार मंत्री असताना सहकारात शिस्त रहावी म्हणून अनेक कायदे केले, मात्र त्यांच्याच नावाने असलेल्या संस्थेत आर्थिक शिस्त न पाळल्याने संस्था अडचणीत आली आहे. या संस्थेचे संस्थापक डॉ. इंद्रजीत मोहिते (dr indrajeet mohite) मात्र संस्था अडचणीत असताना परदेशवारीवर गेले आहेत. त्यामुळे लोकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिली डोंबिवलीतील दहीहंडीला भेट

Maharashtra Rain Update : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर; पुढील ५ दिवस कसं असेल वातावरण? जाणून घ्या

Money Saving Tips : या 5 गोष्टी तुम्ही चुकूनही खरेदी करु नयेत

मुंबईत गोविंदाचा मृत्यू, तोल गेला अन् खाली कोसळला; सणाला गालबोट

Maharashtra Politics: महायुतीच्या दोन्ही दादांमध्ये जुंपली; सोन्याच्या चमचावरून अजितदादा अन् चंद्रकातदादांमध्ये जुगलबंदी

SCROLL FOR NEXT