दहा रुपयांसाठीच्या खूनाने औरंगाबाद हादरले; आरोपी पोलिसांच्या ताब्यात Saam TV
महाराष्ट्र

दहा रुपयांसाठीच्या खूनाने औरंगाबाद हादरले; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

कामाक्षी चौक येथे उतरल्यानंतर भाडे देतांनी रिक्षा चालक बाबा सुलेमान बावजीर यांच्यामध्ये वाद झाला.

साम टिव्ही ब्युरो

अविनाश कानडजे

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षाच्या 10 रुपये भाड्यावरून ग्राहक सुलेमान आणि रिक्षा चालक बाबा मध्ये मारहाण झाली. या मारहाणीत ग्राहकाला आपला जीव गमवावा लागला. आरोपीला सिटी चौक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु 10 रुपयाच्या या घटनेने औरंगाबाद शहर हादरले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिर्झा मुझफ्फर हुसैन मिर्झा अली हुसैन हे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकपासून MH 20 EF 0013 या रिक्षा मध्ये कामाक्षी चौक येथे जाण्यासाठी बसले होते.

कामाक्षी चौक येथे उतरल्यानंतर भाडे देतांनी रिक्षा चालक बाबा सुलेमान बावजीर यांच्यामध्ये 10 रुपायावरून वाद झाला. सुलेमान यांनी रिक्षा चालक बाबा याला 20 रुपये दिले परंतु अजून 10 रुपये द्यावे लागतील म्हणून दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद एवढ्या टोकाला गेला की, रिक्षा चालक बाबाने हाताने आणि डोक्याने मुझफ्फर यांच्या नाकावर मारून त्यांना जखमी केले.

जखमी सुलेमान यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर अपघात विभागातील डक्टरांनी सुलेमान यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकारविषयी सुलेमान यांच्या भाचे मिर्झा मोहसीन यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी रिक्षाचालक बाबा याला अटक केली असून, पोलीस या प्रकरणाचा अजून तपस करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara District Bank Election: महायुतीचा जागावाटपाच फॉर्म्युला ठरला, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मोठी घडामोड

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या उमरग्यात पेट्रोल पंप चालकावर भरदिवसा हल्ला

Diwali Horoscope : दिवाळीत 'या' ३ राशींची चांदीच चांदी! पैसा, प्रगती अन् धनलाभाचे संकेत

Dhasal Movie: 'प्रहार'नंतर ललित प्रभाकरचा नवा अंदाज; 'ढसाळ'चा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Vasai-Virar:महानगरपालिकेच्या द्वारावर झेन-जी आंदोलकांना रोखलं; सुरक्षारक्षकांसोबत तरुणांची धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT