Accident On Nagpur Mumnai Highway Saamtv
महाराष्ट्र

Accident News: मोठी बातमी! नागपूर- मुंबई महामार्गावर ट्रक व कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

अपघातात दोघांना दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nagpur: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अपघातांची मालिका अद्याप सुरुच आहे. नागपूर-मुंबई महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. ज्यामध्ये दोन जण जागीच ठार तर दोन जखमी झाले आहेत. अपघातात दोघांना दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Accident On Nagpur- Mumbai Highway)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूर-मुंबई- महामार्गावर कोंढाळीपासून ७ किमी अंतरावर खुर्सापार पोलीस चौकी जवळ ट्रक व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला असून अपघातात दोन जण जखमी झाली आहेत. हा अपघात इतका भीषण होता की धडकलेल्या कारचा चक्काचूर झाल्याचे दिसत आहे. (Accident News)

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील दोन जखमींना महामार्ग पोलिसांनी कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातानंतर महामार्गावर वाहनांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. (Latest Marathi Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या बंडखोराला घरात कोंडलं! माघारीची भीती, समर्थकांची रणनीती

Maharashtra Live News Update: नंदूरबारमध्ये मेंढपाळ आक्रमक

Saturday Horoscope: 4 राशींचं नशीब पालटणारा! काहींची संकट होणार दूर, वाचा शनिवारचे राशीभविष्य

मोदी-शाहांना हायकोर्टानं ठोठावली शिक्षा? पंतप्रधान मोदी-शाह जेलमध्ये जाणार?

Purnima Birth: पौर्णिमेला जन्मलेले मुलं कशी असतात?

SCROLL FOR NEXT