Nashik News: साडे दहा लाख रुपयांच्या द्राक्षांची परस्पर विक्री; ट्रक मालक आणि चालकाने साधला डाव

Truck Driver and Owner Robbed Grapes: नाशिकच्या पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील ट्रान्सपोर्टमधून साडेदहा लाख रुपयांच्या द्राक्षांची परस्पर विक्री झाल्याचा धक्कादायक बाब उघड झाली आहे.
grapes
grapessaam tv

तबरेज शेख

नाशिक : नाशिकच्या पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील ट्रान्सपोर्टमधून साडेदहा लाख रुपयांच्या द्राक्षांची परस्पर विक्री झाल्याचा धक्कादायक बाब उघड झाली आहे. शरदचंद्र पवार मार्केटमधील व्यापाऱ्याच्या संमतीशिवाय द्राक्षाच्या १ हजार ३७३ क्रेटची परस्पर विक्री झाली. याप्रकरणी ट्रकचालकासह तीन संशयितांवर पंचवटी पोलिसांत विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील ट्रान्सपोर्टमधून साडेदहा लाख रुपयांच्या द्राक्षांची परस्पर विक्री झाल्याचा दावा व्यापारी करणजित सिंग कुलदीपसिंग औलक (रा. प्रेरणा बंगला, विधातेनगर, हिरावाडी) यांनी केला आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार संशयित रमणजित सिंग सिंधू, जकतार सिंग, विक्रमजित सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

grapes
Nagpur Crime News : भाचीला घरात एकटं पाहून मामाची नियत फिरली; धमकी देत केलं संतापजनक कृत्य, काळीमा फासणारी घटना

औलक यांचा मार्केटमध्ये गाळा आहे. तेथे २१ ते २५ फेब्रुवारीदरम्यान दुकानात काळी व हिरवी द्राक्ष भरलेले होते. ट्रक मालक जकतार सिंग व विक्रतजित सिंग आणि चालक रमणसिंग यांनी संगनमताने औलक यांचा विश्वास संपादन करून ट्रकमध्ये सगळा माल भरला. मात्र, व्यापाऱ्याला पूर्वकल्पना न देताच संबंधित मालाची विक्री करून अपहार केला. पंचवटी पोलीस (Police) संशयितांचा शोध घेत असून, पुढील तपास सुरू आहे.

grapes
Solapur Crime : चारित्र्याच्या संशयावरून पतीने कापला पत्नीचा कान, सोलापुरातील संतापजनक घटना

धुळ्यात महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये अतिक्रमण; पालिका प्रशासन आक्रमक

धुळे (Dhule) महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या ओपन स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमण विरोधामध्ये पालिका (Dhule) प्रशासन आक्रमक झाल्याचे बघावयास मिळत आहे.

दरम्यान, अतिक्रमण (Dhule Corporation) काढताना कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा यावेळी उपायुक्त संगीता नांदुरकर यांनी दिला. या मोहिमेत कोणीही बाधा निर्माण करु नये, यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com