Sakshi Sunil Jadhav
बिघडलेले संबंध सुधारतील. आर्थिक व्यवहार टाळावे. प्रेमात यशस्वी व्हाल. गोड पदार्थ दान करावा.
गुरू चे दर्शन घ्यावे किंवा स्मरण करावे. अध्यात्मिक प्रगती होईल आणि भविष्यातील शुभ घटनांचे संकेत भेटतील.
व्यावसायिकांसाठी अनेक संधी घेऊन येणारा दिवस आहे. उद्योगासाठी दिवसभर उपलब्ध रहा. कुलदेवतेचं नामस्मरण करा, शुभवार्ता भेटेल.
मना ईतकी घाई त्रिभूवनात नाही. अशी मानसिक अवस्था होईल. संयम ठेवावा आणि शक्य तेवढे मौन पाळावे.
आरोग्याच्या समस्या दूर होण्यास उपाय भेटतील. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. समाजात मानसन्मान लाभेल.
"बडबड करीता ईच्छिले कार्य नासे" ही म्हण लक्षात ठेवून वागणूक ठेवा. स्त्रीयांना थोड्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या जाणवतील.
शंकराची उपासनाच येणाऱ्या संकटांचं हरण करेल. जबाबदारीची कामं शक्यतो टाळता आल्यास उत्तम. पांढरे पदार्थ खाऊन घरातच दिवस घालवलेला बरा.
जमिनीचे व्यवहार होतील. गणपतीला, काजळ लावून नारळ अर्पण करावं म्हणजे कार्यसिद्धी होईल. व्यवहारात गुप्तता ठेवावी.
नवर्याकडून खूशखबर भेटेल. गृहिणींसाठी आनंदी दिवस आहे. व्यवस्थित सौभाग्य अलंकार धारण करून दिवसाच्या पहिल्या प्रहरी देवपूजा करावी.
मानसिक ताण वाढणार नाही याची काळजी घ्यावी. तुळशीत ठेवलेलं पाणी प्यावं. बिघडलेले नातेसंबंध सुधारतील.
नवीन नौकरी साठी प्रयत्न करा, सुखद यश भेटेल. आपल्या अपत्त्यांसोबत वेळ घालवा. येणारे काही दिवस अंगावर जास्त सोनं धारण करणं टाळावं.
खर्च जपून करा. " सर्वे गुणा: कांचनमाश्रीयंतम्" ही उक्ती लक्षात ठेवा. उसणे दिलेले पैसे परत येण्याचे योग आहेत. गोड पदार्थ खाऊन घराबाहेर निघा म्हणजे कार्यसिद्धी होईल.