Mumbai- Ahmedabad Highway Accident: वाहतूक पोलिसांकडून वारंवार सांगूनही अनेकदा वाहतूकीचे नियम मोडले जातात. ज्यामुळे अनेक दुर्घटना घडतात. विशेषताः वेगावर नियंत्रण न ठेवल्याने अपघाताच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.
मुंबई- अहमदाबाद महामार्गावरुन अशीच एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे.या अपघातात बाईक रायडर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad) बाईक रायडरचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. चारोटी जवळील आंबोली येथे हा अपघात झाला असून यामध्ये एक बाईक रायडर गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की रायडरच्या स्पोर्ट्स बाईकचा पुर्णपणे चक्काचूर झाला आहे.
दर शनिवार रविवारी मुंबईहून मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बाईक रायडर्स ची धूम पाहायला मिळते. सुट्टीच्या दिवशी हे रायडर आपल्या महागड्या स्पोर्ट्स बाईक घेवून बाहेर पडतात. यावेळी भरधाव वेगाने बाईक चालवण्याची त्यांच्यात स्पर्धाच लागल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. त्यामुळेच यापूर्वीही धूम स्टाईलने बाईक रायडर करताना अनेक बाईक रायडर्सचा अपघाती मृत्यू झाले आहेत. (Accident News)
दरम्यान, आज आणखी एका भीषण अपघाताची घटना समोर आली होती. पुणे- सातारा महामार्गावर (Pune-Sarata Highway) ही घटना घडली आहे. कंटेनर आणि बसच्या विचित्र अपघातामध्ये (container and bus Accident) चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातामध्ये 23 प्रवासी जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.