Sakshi Sunil Jadhav
सामाजिक क्षेत्रात चांगली घोडदौड होईल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन सुसंधी लाभेल. प्रसिद्धी मिळेल. मान सन्मान आणि धावपळीने गजबजलेला आजचा दिवस आहे.
मनात ठरवलेल्या गोष्टी होतील. मन आनंदी आणि आशावादी राहील. एखादी महत्त्वाची वार्ता कानावर येईल. दिवस उत्तम आहे. लक्ष्मी उपासना करावी. नातवंडांच्या सुखात दंग असाल.
आपल्या वर्तनाने काही अ डचणी आज ओढवून घ्याल.त्यामुळे कोणाशीही विनाकारण वाद विवाद आज टाळावेत. दैनंदिन कामे सुद्धा रखडण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. व्यवसायामध्ये नवीन तंत्र मंत्र अमलात आणू शकाल.जे ठरवाल ते होईल असा दिवस आहे. म्हणून नियोजनाला विशेष महत्त्व द्या.
आरोग्याच्या तक्रारीने त्रस्त असाल. महत्त्वाची कामे दुपार पूर्वी करून घेणे जास्त योग्य ठरेल. गुप्त शत्रूंचा त्रास संभवतो आहे .
शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. संततीचे प्रश्नही मार्गी लागणार आहेत. विष्णू उपासना यामुळे आपल्या मनोकामना आज पूर्ण होतील. लक्ष्मी प्राप्तीचे योग आहेत.
राहत्या जागेचे प्रश्न असतील तर त्यावर आज काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न कराल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरणार आहेत. प्रयत्नांती परमेश्वर असा दिवस आहे.
जिद्दीने कार्यरत राहणार आहात. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील दहा जणांची कामे एकटे सुद्धा पेलू शकाल. इतके मनोबल चांगले असेल.
कौटुंबिक जीवनात चांगले बदल घडतील. सुसंवाद साधू शकाल. व्यवसायामध्ये प्रयत्नांनी यश मिळेल. कशाला महत्त्व द्यायचे आहे हे ठरवून आज कामे करणे बरे ठरेल.
मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. हाती घेतलेल्या कामांमध्ये निश्चितच तुम्हाला आज सुयश लाभणार आहे.
आरोग्याच्या तक्रारीकडे विशेष लक्ष द्यायला लागेल. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान कमी असेल. खर्च अफाट होईल. अध्यात्मिक विषयाकडे विशेष लक्ष द्यावे .
मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. वरिष्ठांचे सहकार्याने पुढे जाण्याचे योग आहेत. दिवस चांगल्या काही घटना घेऊन आलेला आहे.