Accident News Saam TV
महाराष्ट्र

Accident News : दसरा मेळाव्यावरुन परतणाऱ्या शिंदे गटाच्या २ बसला शहापूरजवळ अपघात, २५ जण जखमी

साम टिव्ही ब्युरो

फयाज शेख

Shahapur News :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर पार पडला. हा दसरा मेळावा संपल्यानंतर परतीच्या प्रवासात शिंदे गटाच्या दोन बसचा शहापूरजवळ दोन ठिकाणी अपघात झाला. या अपघातात 25 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Live Marathi News)

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ शिंदे गटाची बस मेळावा उरकून मुंबई ते सिल्लोड परतीचा प्रवास करत होता. मात्र रात्रीच्या सुमारास शहापूरजवळ बसला मागून ट्रकने जोरदार धडक दिली. त्यानंतर बस डिव्हायडरवर आदळल्याने अपघात झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर ट्रकला मागून शिंदे गटाच्याच दुसऱ्या बसने जोरदार धडक दिली आणि ही बस डाव्या बाजूला जात उलटली. या अपघात 25 जण जखमी झाले असून त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. (Mumbai News)

सांगलीहून निघलेल्या कारला अपघात, एकाचा मृत्यू

त्याआधी काल शिंदे गटाच्याच दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीचा पहाटेच्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात एक ठार तर चौघे जण जखमी झाले आहेत.

विवेक सुरेश तेली (४२ वर्ष) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण गावाजवळ ही घटना घडली. दूध वाहतूक करणाऱ्या टँकरने कारला पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

SCROLL FOR NEXT