Nashik Accident News  Saam TV
महाराष्ट्र

Nashik Accident News : भरधाव कारचा टायर फुटला अन् अघटित घडलं, दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन युवकांचा मृत्यू

Accident News : नामदेव विठ्ठल शिद (36 वर्षे) आणि सुनील मनोहर महाले (26 वर्षे) अशी मयत तरुणांची नावे आहेत.

साम टिव्ही ब्युरो

तरबेज शेख

Nashik News : नाशिक त्रंबकेश्वर रस्त्यावरील हॉटेल संस्कृतीसमोर झालेल्या भीषण अपघातात दोन युवक ठार झाले. कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला आहे. टायर फुटल्यानंतर भरधाव कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींना जाऊन धडकली. यात दुचाकीवरील दोघे युवक जागीच ठार झाले आहेत.

नामदेव विठ्ठल शिद (36 वर्षे) आणि सुनील मनोहर महाले (26 वर्षे) अशी मयत तरुणांची नावे आहेत. काल म्हणजेच 19 जूनच्या रात्री हॉटेल संस्कृतीसमोर हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, त्रंबक-नाशिक रोडवरून भरधाव वेगात एक कार येत होता. मात्र अचानक कारचा टायर फुटला. त्यामुळे भरधाव वेगात असलेली कार अनियंत्रित झाली आणि कार आपला रस्ता सोडून विरुद्ध दिशेवरुन येणाऱ्या दुचाकीला धडकली. कार वेगात असल्याने दुचाकाला दिलेल्या जोरदार धडकेत दोन्ही युवक जागीच ठार झाले. (Latest Marathi News)

अपघाताची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गंभीर जखमी युवकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; पर्यवेक्षिकेसाठी लागू असलेली वयाची अट रद्द

गरब्यासाठी भाड्यानं पार्टनर मिळणार?गरब्यासाठी मुलींची बोली, संभागी ब्रिगेड आक्रमक

Fact Check: गाड्यांवर लिंबू-मिरची लावल्यास दंड? गाडी मालकाला 5 हजारांचा दंड लागणार?

कागदावर केमिकल टाका, नोटा तयार करा? 500ची नोट तयार करणारं 'केमिकल रॅकेट'

पेट्रोल पंपावर UPI शुल्क बंद होणार? UPI शुल्काविरोधात पंप चालक आक्रमक

SCROLL FOR NEXT