Raigad Bike Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : मुंबईहून पुण्याला जाताना तरुणाचा भीषण अपघात; घाटात तोल गेला, १०० फूट दरीत कोसळून मृत्यू

Raigad Bike Accident : रायगड जिल्ह्यात तरुण १०० फूट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

रायगड जिल्ह्यातील वरंधा घाटात दुचाकी दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

तीव्र वळणावर नियंत्रण सुटल्याने अपघात

१०० फुट खोल दरीत पडला तरुण

डोक्याला गंभीर दुखापत व रक्तस्त्रावामुळे जागीच मृत्यू

पोलिस तपास सुरू

रायगडमध्ये भीषण अपघात झाला आहे. जिल्ह्यातील महाड भोर मार्गावरील वरंधा घाटात दुचाकीस्वाराचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तरुण १०० फूट खाली दरीत कोसळला. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. या मृत तरुणाचे नाव शिवाजी डेरे असे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी डेरे हा तरुण दुचाकीने मुंबईवरून त्याच्या मूळगावी शिळींब येथे जात होता. यादरम्यान रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या वरंध भोर घाटात तीव्र वळणात शिवाजी येताच त्याला साईट पट्टीचा अंदाज न आल्याने गाडी १०० फुट खोल खाली दरीत कोसळली.

या दुर्घटनेत शिवाजीला गंभीर दुखापत झाली. त्याला डोक्याला मार लागल्याने तसेच रक्तस्त्राव जास्त प्रमाणात झाल्याने शिवाजीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली. शिवाजीचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिवाजीचा मृत्यू हा अपघाती आहे. १०० फूट खोल दरीत कोसळल्याने त्याच्या डोक्याला जोरात मार लागला. त्यात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान तो मद्य प्राशन करून गाडी चालवत होता का याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र नेमका अपघात झाला कसा? याचा पोलीस अद्यापही तपास करत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मृत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नेल एक्स्टेंशन करताना 'या' गोष्टींची अवश्य काळजी घ्यावी

Maharashtra Live News Update: 11 हजार दिव्यांनी लखलखला अंबड येथील मत्स्योदरी देवीचा परिसर,दीपोत्सवासाठी परदेशी पाहुण्याची हजेरी

J J Hospital Mumbai: डॉक्टर महिलेला अपमानास्पद वागणूक; राज्य महिला आयोगाची सर जे जे समूह रुग्णालयावर कारवाई

नाद करा, पण 'बिजल्या'चा कुठं! शेतकऱ्यानं ११ लाखांना बैल विकला; घोड्यालाही घाम फोडणाऱ्या बिजल्याचा खुराक जाणून थक्क व्हाल

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव काय होतं?

SCROLL FOR NEXT