Sangli Accident News saam tv
महाराष्ट्र

Accident News: कोरोनापेक्षाही भयंकर! छत्रपती संभाजीनगरमधील अपघात आणि मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Chhatrapati Sambhajinagar News : धुळे-सोलापूर महामार्गावर अतिवेगामुळे अपघातांची संख्या वाढत आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपघातांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यात 120 दिवसांमध्ये तब्बल 273 अपघात झाल्याची नोंद झाली आहे. यानुसार दिवसाला सरासरी दोनपेक्षा अधिक अपघात होत असून यात प्रतिदिन एकापेक्षा जास्त मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये 1 जानेवारी ते 30 एप्रिल या कालावधीत एकूण झालेल्या 273 अपघातांपैकी प्राणांतिक अपघातांची संख्या 152 इतकी आहे, ज्यात 159 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित अपघातामध्ये नागरिक जखमी झाला आहे किंवा त्यास कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. या अपघांमध्ये 265 जण जखमी झाले आहेत, यात 121 जण गंभीर व किरकोळ जखमी आहेत तर 144 जण जखमी झाले आहेत. (Accident News)

शहराजवळून तसेच जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक अपघात घडले आहेत. या महामार्गावर अतिवेगामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. तसेच या महामार्गावर अपघात झाल्यास त्यात मृत्यू होण्याची शक्यता सर्वाधिक असते. या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर-जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या दोन महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात अपघातांची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही महामार्ग अत्यंत वर्दळीचे आहेत.

कोणत्या महिन्यात किती अपघात आणि मृत्यू?

>> जानेवारी - एकूण अपघात 63, मृत्यू 42, जखमी 48

>> फेब्रुवारी - एकूण अपघात 65, मृत्यू 38, जखमी 61

>> मार्च - एकुण अपघात 68, मृत्यू 40, जखमी 65

>> एप्रिल - एकूण अपघात 77, मृत्यू 39, जखमी 91

अपघातांची कारणे

अपघाताचे अनेक कारणे समोर येत आहेत, यामध्ये रस्ते चांगले झाल्याने अतिवेग हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. त्याशिवाय निष्काळजीपणे वाहन चालून स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात आणण्याचा अनेक घटना उघडकीस आले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना ठरवून दिलेल्या वेग मर्यादेतच वाहन चालवावे. तसेच निष्काळजीपणाने वाहन चालवू नये, वाहन चालवताना सिट बेल्ट लावावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येते आहे. (Latest News Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video of Namaz at Shaniwarwada: 'ते' एक ट्विट आणि शनिवारवाड्यातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल; ऐन दिवाळीत पुण्यातील वातावरण का तापले?

Aditi Rao Hydri: अदिती राव हैदरीचा नवा डेनिम कॉर्सेट आणि बबल स्कर्ट लूक पाहिलात का?

दिवाळीत धमाका! शिंदेंचा थेट फडणवीसांना धक्का, भाजपच्या एकनिष्ठ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Politics: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचा पराभव निश्चित, निवडणुकीआधीच भाजप नेत्याची भविष्यवाणी

Leftover Chapati Recipe : रात्रीच्या चपात्या उरल्या? सकाळी नाश्त्याला बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

SCROLL FOR NEXT