Mumabi-Goa Highway Bus Fire Saam TV
महाराष्ट्र

Raigad Bus Fire : मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसला भीषण आग, १९ प्रवाशी थोडक्यात बचावले

Mumabi-Goa Highway Bus Fire : महाड येथे सावित्री नदीवरील पुलावर ही घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचं मोठं नुकसान झालं आहे.

प्रविण वाकचौरे

सचिन कदम

Ratnagiri Bus Accident :

मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्री एका खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. महाड येथे सावित्री नदीवरील पुलावर ही घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचं मोठं नुकसान झालं आहे.

बुधवारी मध्यरात्री १.४५ वाजता बसमधील सर्व प्रवासी गाढ झोपेत असताना धावत्या बसच्या टायरने अचानक पेट घेतला. टायरने पेट घेतल्यानंतर काही क्षणात बस आगीच्या भक्षस्थानी गेली. बसला आग लागली त्यावेळी बसमधून एकून १९ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने बसमधून प्रवास करणारे सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

घटनेची माहिती मिळताच काही वेळात पोलीस, अग्निशमन दलाचं जवान घटनस्थळी दाखल झाले. काही वेळात अग्नीशमन दलाच्या जवानांनी बसला लागलेली आग विझवली. मात्र बस जवळपास पूर्ण जळून खाक झाली आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT