bribe 
महाराष्ट्र

प्रांताधिकारी मनीषा राशिनकरसह काेतवाल ACB च्या जाळ्यात

साम टिव्ही ब्युरो

- कैलास चाैधरी

उस्मानाबाद : वाळूचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी प्रति महा एक लाख 10 हजार रुपयांची मागणी केल्यानंतर तडजाेडी अंती प्रांताधिकारी मनीषा अरुण राशिनकर यांना 90 हजार रुपये तसेच कोतवाल विलास नरसींग जानकर यास 20 हजार रुपये देण्याचे निश्चित झाले हाेते. त्यानूसार तक्रारदाराकडून काेतवाल जानकर याला 20 हजार रुपये स्विकारताना bribe लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. दरम्यान प्रांताधिकारी राशिनकर आणि काेतवाल यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. (acb-raids-usmanabad-manisha-raishnkar-vilas-jankar-bribe-sml80)

उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम येथे प्रांताधिकारी मनीषा राशिनकर कार्यरत आहेत. परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्यास वाळूचा व्यवसाय चालू करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली.

वाळू वाहतुकीचा टिप्पर, जेसीबी व तीन ट्रक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू ठेण्यासाठी राशनिकर यांनी तक्रारदारास एक लाख 10 हजार रुपये प्रतिमहिना द्यावे लागतील असे सांगितले हाेते. तक्रारदाराने तडजाेडी अंती राशनिकरांना 90 हजार रुपये तर कोतवाल जानकर यास 20 हजार रुपये देण्याचे ठरवले.

तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागास याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग) प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. काेतवाल जानकर यास 20 हजार रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस निरिक्षक गौरिशंकर पाबळे, अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके यांच्या पथकाने केली. मनिषा राशनिकर आणि विलास जानकर यांच्यावर या प्रकरणी भुम पाेलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT