satara crime news saam tv
महाराष्ट्र

३ लाखांची लाच मागितली; राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघांवर गुन्हा दाखल

सातारा पाेलिसांत गुन्हा दाखल केल्याची माहिती अशोक शिर्के (पोलीस उपाधीक्षक, एसीबी) यांनी दिली.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : बियर शॉपीचा परवान्याचे प्रकरण वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीने (acb) राज्य उत्पादन शुल्क विभाग (state excise department) सातारा कार्यालयातील तिघांवर (satara) गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एक निरीक्षक, दुय्यम निरीक्षक तसेच जवान याचा समावेश आहे. (satara latest marathi news)

एसीबीच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनूसार बियर शॉपीच्या परवानाचे प्रकरण वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यासाठी दुय्यम निरीक्षक आणि जवान यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन लाख रुपये लाच मागणी केली. तसेच निरीक्षक यांनी तक्रारदार यांना लाच रक्कम मागणीस प्रेरणा दिली. ही बाब निष्पन्न झाल्याने तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क सातारा कार्यालयातील निरीक्षक सतीश विठ्ठलराव काळभोर (वय ५६) , दुय्यम निरीक्षक दत्तात्रय विठोबा माकर (वय ५६) आणि जवान नितीन नामदेव इंदलकर (वय ३६) यांच्यावर सातारा पाेलिसांत गुन्हा दाखल केल्याची माहिती अशोक शिर्के (पोलीस उपाधीक्षक, एसीबी) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning tiredness: रोज सकाळी उठल्यावर थकल्यासारखं वाटत असेल तर 'हे' उपाय करा

BMC Mayor Election: महापौरपदासाठी भाजपची मोठी खेळी; मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार?

अजितदादांच्या अंत्यविधीवेळी बारामतीत धक्कादायक प्रकार; गर्दीत 25 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य-असत्य; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

'भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलमुळे अजितदादांचा घात'; विमान पडलं की पाडलं? संजय राऊतांना संशय

SCROLL FOR NEXT