Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अबू आझमींना मुंबईच्या सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा; अटकेचं संकट टळलं!

Samajwadi Party Mla Abu Azmi : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात विधानसभेतून निलंबित करण्यात आले होते. मुंबईतील सेशन कोर्टाने अबू आझमींना आता दिलासा दिलाय.

Bharat Jadhav

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना मुंबईच्या सत्र न्यायालयाने दिलासा दिलाय. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. औरंगजेबचे कौतुक केल्यामुळे अबू आझमी वादात सापडले होते. औरंगजेब उत्तम प्रशासक होता, असं वादग्रस्त विधान आझमी यांनी केले होते, त्यामुळे आझमी यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले होते. आता मुंबईतील सेशन कोर्टाने त्यांना दिलासा दिलाय.

अबू आझमींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अबू आझमीं यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात त्यांना अटक होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने स्वीकारला असून त्यांना २० हजार रुपयांच्या बाँडवर अटकेपासून संरक्षण दिले गेले. पण १२,१३ आणि १५ मार्च रोजी त्यांना तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागणार आहे.

काय आहे प्रकरण?

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार आझमी यांनी औरंगजेबचं कौतुक केलं होतं. तो उत्तम प्रशासक होता, असं म्हणत त्यांनी औरंगजेबचं कौतुक केलं होतं. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भातही काही विधान केली होती. यामुळे दोन्ही सभागृहात मोठा वाद झाला होता. औरंगजेबाच्या कौतुक केल्याप्रकरणी राज्यभरात त्यांच्याविरोधात आंदोलने झाली.

विधीमंडळाच्या सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमींच्या निलंबनाची मागणी केली होती. एकनाथ शिंदेंच्या मागणी प्रस्तावाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्यता देत आझमी यांचे अधिवेशन कालावधी संपेपर्यंत निलंबन करण्यात आले. राजकीय नेत्यांकडून आझमी यांच्यावर टीका केली जात होती.

राज्यभरातही त्यांच्याविरोधात संतापाचा लाट होती, यावरून आझमी यांनी आपलं विधान मागे घेत, आपण दोन्ही छत्रपतींचा कधीच अपमान करू शकत नाही. तसेच अपमान करणार देखील नाही. पण आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. या विषयाला राजकीय वळण देण्यात आल्याचा दावा आझमी यांनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT