maratha andolan saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: मराठा आंदोलनात गैरहजर? सहभागी न होणाऱ्या नेत्यांवर गावकीची नजर

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

जरांगेंच्या आंदोलनात सहभागी न होणाऱ्या राजकीय नेत्यांचे एका सोशल मीडिया पोस्टमुळे धाबे दणाणले आहेत. मात्र या पोस्टमध्ये नेमकं काय आहे? मनोज जरांगेंनी राजकीय नेत्यांना काय इशारा दिलाय ते पाहूयात.

मनोज जरांगेंचं भगवं वादळ मुंबईच्या उंबरठ्यावर आलंय. मुंबईकडे निघालेल्या जरांगेंच्या आंदोलनाला गावागावात पाठींबा वाढत चाललाय. त्यातच आता एका सोशल मीडियावरच्या पोस्टने आंदोलनापासून अंतर राखणाऱ्या राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

काय होती पोस्ट?

सोशल मीडियावर असलेल्या पोस्टमध्ये जरांगेंच्या आंदोलनात सहभागी न होणाऱ्या नेत्यांवर गावकीचं लक्ष असणार आहे. त्यासाठी जो नेता आंदोलनात सहभागी होणार नाही त्याची गावातील पत आणि राजकीय करियर उद्ध्वस्त करण्याचा इशाराच या पोस्टमधून देण्यात आलाय.

जो नेता समाजासाठी रस्त्यावर तोच नेता आपला, असंही या पोस्टमध्ये म्हटलंय. मात्र या पोस्टचं मूळ आहे ते मनोज जरांगेंच्या बीडच्या सभेत... जरांगेंनी बीडच्या सभेतूनच राजकीय नेत्यांवर गावकीने नजर ठेवण्याचं आवाहन केलं होतं.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जरांगेंनी आरक्षणाला पाठिंबा न देणाऱ्या नेत्यांचं करियर उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला होता. त्याचा अनेक नेत्यांना मोठा फटका बसला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी जरांगेंसह मराठा आंदोलकांनी पाठिंबा न देणाऱ्या नेत्यांना इशारा दिल्याने राजकीय नेत्यांची इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे आता राजकीय करियरच पणाला लागणार असल्याने मतांचं गणित जुळवण्यासाठी नेत्यांना आंदोलनात सहभागी व्हावंच लागणार, हे मात्र निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veen Doghatli Hi Tutena: स्वानंदी–समरची लग्नगाठ बांधली जाणार पण...; 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये येणार नवा ट्विस्ट

IPS अधिकारी आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, तपास अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं; सुसाईड नोटमधून गंभीर आरोप

Maharashtra Live News Update: निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व जिल्हाध्यक्षांची अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार

बुधवार पेठेत धक्कादायक प्रकार, पतीने केला पत्नीचा खून; एक मुलगा, दोन मुली पोरकी

Manoj Jarange: मुंडक्यावरच पाय द्यावा लागेल; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनोज जरांगे भडकले|VIDEO

SCROLL FOR NEXT