Sangli News yandex
महाराष्ट्र

Sangli News: उरुसात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 20 ते 25 नागरिकांवर हल्ला, लचके तोडले

Sangli News: स्थानिक नागरिक यांच्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे.

Dhanshri Shintre

सांगलीत उरुसात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकुळ उडाला आहे. 20 ते 25 भाविकांवर हल्ला करून लचके तोडल्याची घटना घडली आहे, तर महापालिका क्षेत्रातील भटकी कुत्री ग्रामीण भागात सोडत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

सांगलीच्या मालगाव येथे बावाफन उरूसनिमित्त येणाऱ्या भाविकांवर तसेच स्थानिक नागरिक यांच्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. ताणंग रस्ता, शास्त्री नगर पाण्याची टाकी, सिद्धार्थ नगर निकम वस्ती, बावा फण दर्गा परिसर या ठिकाणी पिसाळलेल्या कुत्र्याने भाविकांवर हल्ला केला आहे.

वृद्ध पुरुष, लहान मुले, वृद्ध महिला यांच्या हाता पायाला चावा घेतल्याने जखमी झाले आहेत. 20 ते 25 भाविक आणि स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. मिरज शासकीय रुग्णालय येथे जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार सुरू आहेत.

सध्या उरुसानिमित्त मालगाव येथे गर्दी असल्याने पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पिसाळलेला कुत्र्याचा अद्याप शोध घेतला नसल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. सांगली महापालिका क्षेत्रातील भटकी कुत्रीही मोठ्या प्रमाणात मालगाव सुभाष नगर परिसरात सोडली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update : मान्सून लांबणीवर, पण राज्यात आज वादळी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

IPL फायनल हरल्यानंतर गुजरात टायटन्ससोबत मोठी दुर्घटना; भररस्त्यात टीमच्या बसला लागली आग, उडाली एकच खळबळ

MLC Election : ठाण्यात एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, विश्वासू उमेदवाराला मैदानात उतरवले

Vasai-Virar Tourism : रिमझिम पावसात समुद्रकिनारी चिंब भिजा, हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात वसईत लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT