MLA Abhimanyu Pawar News, Latur News, Devendra Fadnavis News Saam Tv
महाराष्ट्र

अभिमन्यू की संभाजी ? मंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस कोणाची निवड करतील

उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

दीपक क्षीरसागर

लातूर: महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले आणि बंडखोर आमदारांच्या साथीने सरकार स्थापन करणायाचा चंग माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधला. भाजप (BJP) सत्तेत येईल असेच चित्र असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अतिशय विश्वासू व निकटवर्तीय समजले जाणारे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांची फडणवीस यांच्या मंत्री मंडळात वर्णी लागणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.(Latur Latest Marathi News)

२०१४ मध्ये मंत्री असलेले संभाजी पाटील निलंगेकर हे देखील रेसमध्ये आहेत. उद्या, एक जुलै रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा शपथविधी पार पडणार आहे, त्यात देवेंद्र फडणवीस अभिमन्यू की संभाजी यापैकी कोणाची निवड करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

१ जुलै रोजी योगायोगाने आमदार अभिमन्यू पवार यांचा वाढदिवस असून, गुरु आपल्या शिष्याला मंत्रीपदाची भेट देणार का? हे पहावे लागेल. विरोधी पक्षातील आमदार असुनही आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतरस्त्याचा औसा पॅटर्ण संबंध राज्याला दिशा देणारा उपक्रम राबविला. शेकडो किलोमिटर रस्ते मोकळे करीत बांध तेथे रस्ता देण्याच्या त्यांच्या या कार्याची भुरळ देशातील अनेक राज्यांना पाडली.

काही दिवसांपूर्वीच एकशे दोन ताप असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी औशातील भव्य शेतकरी मेळाव्याला व पवारांनी केलेल्या कामांच्या लोकापर्ण व उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावत "जो एखादा मंत्रीही असे काम करु शकत नाही असे काम अभिमन्यू यांनी केल्याची स्तुती खुद्द फडणवीस यांनी संभाजी पाटील निलंगेकरांसमोरच केली. याच कार्यक्रमात संभाजी पाटील यांनी देखील जे आम्हाला जमले नाही ते तुम्ही करुन दाखविले अशी पुष्टी जोडली होती. आजारी असतानाही अभिमन्यूसाठी फडणवीसांनी थांबणे, त्यांच्याबाबत गौरोद्गार काढणे, त्यांची पाठ थोपटणे हे आगामी काळासाठी सूचक असल्याचे मानले जात आहे.

आता एक जुलै रोजी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी आणि त्याच दिवशी अभिमन्यू पवारांचा वाढदिवस असल्याने मंत्रीपदाची माळ पवारांच्या गळ्यात घालणार का? मात्र हे करीत असतांना फडणवीसांना (Devendra Fadnavis) निलंगेकरांना दुखवणेही सोपे जाणार नसल्याने निलंगेकरांपेक्षा पवारांचे वजन वाढविताना त्यांना मोठी कसरत करावी लागणार हे मात्र नक्की. कारण काँग्रेसचा बालेकिल्ला जमीनदोस्त करीत संबंध लातूर जिल्हा भाजपमय करण्यात संभाजी पाटील यांचे मोठे योगदान आहे, असंही बोलले जात आहे.

एकीकडे पट्टशिष्य तर दुसरीकडे त्यांच्याच तालमीत तयार झालेला तगडा कार्यकर्ता या दोघांमध्ये सुसंवाद वाढविणार नाहीत ते फडणवीस कसले? सुसंवाद वाढवून ते कुणाला झुकते माप देणार यावर जिल्ह्यातील भाजपचे पुढील राजकारण अवलंबून असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

World Diabetes Day 2024: कमी वयातील व्यक्तींना का होतोय Diabetes? तज्ज्ञांनी स्पष्ट केली कारणं आणि उपाय

Maharashtra Politics : जालन्यात शरद पवारांच्या उमेदवारावर हल्ला, ताफ्यातील गाडीवर दगडफेकीचा आरोप, गुन्हा दाखल

Vande Bharat Ticket: वंदे भारत तिकीट रद्द केल्यास किती पैसे माघारी मिळणार? तिकीट बुक करण्याआधी हे नियम अवश्य वाचा

Viral Video: पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केल्याचा राग अनावर अन् मग लाथा- बुक्क्यांनी एकमेंकाना कुट-कुट कुटले; हाणामारीचा व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT