देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ उद्याच घेणार?

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे.
Eknath Shinde News, Maharashtra Politics News, Maharashtra Political Crisis,
Eknath Shinde News, Maharashtra Politics News, Maharashtra Political Crisis, saam tv
Published On

रामनाथ दवणे, सुशांत सावंत

मुंबई: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. त्यानंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना आणि राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. दुसरीकडे, आजच भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे उद्याच शपथ घेतील, अशी शक्यता आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार गुवाहाटीत होते. त्यानंतर काल, बुधवारी रात्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार हे गोव्याला आले. त्यानंतर रात्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर भाजपकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. (Maharashtra Politics)

Eknath Shinde News, Maharashtra Politics News, Maharashtra Political Crisis,
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Eknath Shinde News, Maharashtra Politics News, Maharashtra Political Crisis,
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंचा उद्याच शपथविधी?

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, उद्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची आणि शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगितले जाते.

एकनाथ शिंदे-फडणवीस भेट

एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. ते थोड्याच वेळात मुंबईत पोहोचतील. मुंबईत आल्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील. तशी माहिती शिंदे यांनी स्वतःच गोव्यातील विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली आहे. सागर या निवासस्थानी फडणवीस आणि शिंदे यांची भेट होणार आहे. या भेटीनंतर साधारण साडेतीन वाजता फडणवीस आणि शिंदे हे राजभवन येथे जातील. तसेच सरकार स्थापनेचा दावा करतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

इतर सहा मंत्रीही शपथ घेणार?

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे उद्याच दुपारी शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत कोणकोणते मंत्री शपथ घेतील, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. सूत्रांनुसार, फडणवीस आणि शिंदे यांच्यासोबत इतर सहा नेतेही मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे कळते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com